अंबरनाथमध्ये चार्जिंगला लावलेल्या आयफोनचा स्फोट

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

ठाणे : चार्जिंगला लावलेल्या आयफोनचा स्फोट होऊन एक तरुण जखमी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अमित भंडारी असं या जखमी तरुणाचं नाव आहे. यासंदर्भात अमित अॅपल कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार आहे. अंबरनाथच्या कोहोजगाव या ठिकाणी राहणाऱ्या अमितने गेल्यावर्षी अॅपल कंपनीचा आयफोन 6 हा फोन खरेदी केला होता. रविवारी (12 मे) त्याच्या फोनची बॅटरी कमी असल्याने […]

अंबरनाथमध्ये चार्जिंगला लावलेल्या आयफोनचा स्फोट
Follow us on

ठाणे : चार्जिंगला लावलेल्या आयफोनचा स्फोट होऊन एक तरुण जखमी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अमित भंडारी असं या जखमी तरुणाचं नाव आहे. यासंदर्भात अमित अॅपल कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार आहे.

अंबरनाथच्या कोहोजगाव या ठिकाणी राहणाऱ्या अमितने गेल्यावर्षी अॅपल कंपनीचा आयफोन 6 हा फोन खरेदी केला होता. रविवारी (12 मे) त्याच्या फोनची बॅटरी कमी असल्याने त्याने घरात फोन चार्ज करण्यासाठी लावला. चार्जिंगला असतानाच त्याने मेसेज वाचण्यासाठी फोन हातात घेतला. यानंतर अवघ्या काही सेकंदात आयफोनचा स्फोट झाला. या स्फोटात अमितच्या दोन्ही पायांना जखम झाली.

या घटनेनंतर अमितला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या अमितवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अमित अॅपल कंपनीकडे तक्रार दाखल करणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून मोबाईल स्फोट होण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. मोबाईल चार्जिंगला असताना, चार्जिंग लावून फोनवर बोलत असताना अचानक स्फोट झाल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. दरम्यान नुकतंच अॅपल या नामांकित कंपनीच्या मोबाईलचा स्फोट झाल्याने तंत्रज्ञान  विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या : 

औरंगाबादेत मोबाईल बॅटरीशी खेळताना स्फोट, दोन मुलं जखमी

ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलचा स्फोट, चिमुकल्याच्या हाताची पाचही बोटं तुटली!