AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलचा स्फोट, चिमुकल्याच्या हाताची पाचही बोटं तुटली!

नांदेड : ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्याचे अनेकदा ऐकलं असाल. मात्र, आता केवळ फसवणूकच नव्हे, तर जीवावर बेतणारी घटना समोर आली आहे. ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलच्या स्फोटाची हादरवणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. मोबाईलचा स्फोट झाल्यानं मुलाच्या हाताची बोटं तुटून पडली आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील जिरगा तांड्यावर मोबाईलवर गेम खेळताना स्फोट झाल्याने आठ वर्षाच्या मुलाला त्याचा हात […]

ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलचा स्फोट, चिमुकल्याच्या हाताची पाचही बोटं तुटली!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

नांदेड : ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्याचे अनेकदा ऐकलं असाल. मात्र, आता केवळ फसवणूकच नव्हे, तर जीवावर बेतणारी घटना समोर आली आहे. ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलच्या स्फोटाची हादरवणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. मोबाईलचा स्फोट झाल्यानं मुलाच्या हाताची बोटं तुटून पडली आहेत.

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील जिरगा तांड्यावर मोबाईलवर गेम खेळताना स्फोट झाल्याने आठ वर्षाच्या मुलाला त्याचा हात गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीपती जाधव यांनी टीव्हीवरील मोबाईलची जाहिरात पाहून मोबाईल ऑनलाईन खरेदी केला. मात्र त्याच मोबाईलने त्यांचा मुलगा प्रशांतचा घात केला आहे.

प्रशांत नेहमीप्रमाणे मोबाईलवर गेम खेळत बसला होता. अचानकपणे मोबाईलचा स्फोट झाल्याने त्याच्या डाव्या हातात मोबाईल होता त्या हाताच्या तळ्यासह पाचही बोटे अक्षरशा उडून पडलीत. त्याचा तळहात छिन्नविछिन्न झाला. मोबाईलचे तुकडे त्याच्या छातीत, पोटाला लागून तेथेही त्याला दुखापत झाली.

दैव बलत्तर होत म्हणून प्रशांत वाचला. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर उदगीरमध्ये खासगी रुग्णालयात त्याला पुढील उपचार करण्यासाठी पाठवलं आहे.

खेळण्या-बागडण्याच्या वयात या मोबाईलने प्रशांतचा घात केला आहे. फसव्या जाहिरातीला बळी पडून स्वस्तात ऑनलाईन फोन खरेदी करु नका.

बातमीचा व्हिडीओ :

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.