iPhone 9 : मार्चमध्ये लाँच होणार सर्वात स्वस्त आयफोन, किंमत किती?

| Updated on: Feb 21, 2020 | 12:27 PM

त्यामुळे अॅप्पलच्या या फोनचे नाव iPhone 9 असे ठेवण्यात आले (iPhone 9  Price) आहे.

iPhone 9 : मार्चमध्ये लाँच होणार सर्वात स्वस्त आयफोन, किंमत किती?
आयफोनवर यूट्यूब वापरणाऱ्या युजर्ससाठी खुशखबर
Follow us on

नवी दिल्ली : स्मार्टफोनच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून ‘APPLE’ ला ओळखलं (iPhone 9  Price) जातं. अॅप्पलने iPhone 8 लाँच केल्यानंतर थेट iPhone X लाँच केला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये iPhone 9 या फोनबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. ही उत्सुकता अधिक ताणून न ठेवता कंपनीने या फोनच्या लाँचिंगच्या तारखेची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 9 हा नवा फोन येत्या मार्च अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. हा फोन आयफोनच्या सीरिजमधील सर्वाधिक स्वस्त फोन असल्याचेही बोललं जात आहे. यापूर्वी या फोनचे नाव iPhone SE2 असल्याचे सांगण्यात येत होतं.

iPhone 9 या फोनचे डिझाईन iPhone 8 प्रमाणे असू शकते. तर या फोनचे इंटरनल डिझाईन हे iPhone 11 प्रमाणे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अॅप्पलच्या या फोनचे नाव iPhone 9 असे ठेवण्यात आले (iPhone 9  Price) आहे.

वैशिष्ट्ये

नवीन आयफोनमध्ये iPhone 8 प्रमाणे 4.7 इंचाचा LCD डिस्प्ले, Touch ID चे बटण देण्यात आलं आहे. मात्र या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक असणार नाही. कमी किमतीत नवीन आयफोन खरेदी करणाऱ्या युजर्ससाठी हा आयफोन अतिशय खास असणार आहे.

तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार, iPhone 9 मध्ये A13 बायॉनिक चिपसेट लावण्यात आली आहे. त्यामुळे एनर्जी सेव्ह होण्यास मदत होणार आहे. अॅप्पलच्या सर्वच नव्या मोबाईलमध्ये म्हणजेच iPhone 11 च्या सीरिजमध्येही या चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. iPhone 9 हा iOS 13 ही ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

iPhone 9 मध्ये 3 जीबी रॅम असणार आहे. तर इंटरनल स्टोरेअजसाठी 64GB आणि 128GB असे दोन वेरिअंट असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या मार्च अखेरीस अॅप्पलच्या एका कार्यक्रमात हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. या आयफोनची किंमत 399 डॉलर म्हणजेच जवळपास 28 हजार असू (iPhone 9  Price) शकते.