Apple : आता ‘अ‍ॅपल’ वर क्रेडिट-डेबिट कार्ड पेमेंट नाही, युजर्सला ट्रान्झॅक्शनचा ‘हा’ नवा पर्याय

| Updated on: May 05, 2022 | 8:17 PM

अ‍ॅपल आयपॅड किंवा अ‍ॅपल आयफोन वापरणाऱ्यांना स्वतंत्र अ‍ॅपल आयडी (Apple ID) निर्माण करावे लागेल. अ‍ॅपल डिव्हाईसवर त्यासाठी स्वतंत्र सेटिंग्स करावी लागेल आणि त्यासोबत बँक तपशील सादर करणं बंधनकारक असेल.

Apple : आता ‘अ‍ॅपल’ वर क्रेडिट-डेबिट कार्ड पेमेंट नाही, युजर्सला ट्रान्झॅक्शनचा ‘हा’ नवा पर्याय
अ‍ॅपल
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : स्मार्टफोन जगतातील अग्रणी अ‍ॅपलने भारतीय क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे (Credit and Debit card) पेमेंट करण्याचा पर्याय नाकारला आहे. रिझर्व्ह बँकेने यूपीआय आधारीत पेमेंट बाबतीत धोरणात बदल केला आहे. त्यानंतर अ‍ॅपलने भारतीय क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे स्विकारण्यास थेट नकार दिला आहे. त्यामुळे अ‍ॅपलच्या सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना यापुढे अ‍ॅपल फंड (Apple fund) या सेवेचा स्विकार करावा लागणार आहे. त्याद्वारे अ‍ॅपल सेवेचे सबस्क्रिप्शन करण्याचा पर्याय ग्राहकांसाठी खुला असणार आहे. अ‍ॅपल आयपॅड किंवा अ‍ॅपल आयफोन वापरणाऱ्यांना स्वतंत्र अ‍ॅपल आयडी (Apple ID) निर्माण करावे लागेल. अ‍ॅपल डिव्हाईसवर त्यासाठी स्वतंत्र सेटिंग्स करावी लागेल आणि त्यासोबत बँक तपशील सादर करणं बंधनकारक असेल.

‘अ‍ॅपल’ यूजर्स नाराज-

कोणत्याही ग्राहकाला अ‍ॅपल म्युझिक किंवा अ‍ॅपल टीव्ही सारख्या सेवांचे सबस्क्रिप्शन करायचे असल्यास अ‍ॅपलने स्वतंत्र ट्रान्झॅक्शन पद्धती विकसित केली आहे. यापूर्वी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तसेच यूपीआय मार्फत करण्याची मुभा होती. दरम्यान, विविध अ‍ॅपल ग्राहकांनी ट्विटरवर नव्या निर्णयाविरोधात मोहीम उघडली होती. ग्राहकांना नव्या निर्णयामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे.

आरबीआयचे नवे नियम

आरबीआयनं गेल्या ऑक्टोबर महिन्यात महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार ऑटो रिकरिंग पर्यायासाठी डेबिट-क्रेडिट किंवा यूपीआय द्वारे पेमेंट स्विकारण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे अ‍ॅपलने पर्याय ट्रान्झॅक्शन पद्धती स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

पेमेंट असे करा-

अ‍ॅपल ID मध्ये फंड बॅलन्स जमा करून अ‍ॅपल सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन कंपनीच्या सपोर्ट पेजच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. काही ट्रान्झॅक्शन नाकारले जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे अ‍ॅपल ID फंडचा वापर करण्याद्वारे सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी कोणत्याही स्वतंत्र उपकरणाची आवश्यकता नसणार आहे. संपर्करहित पेमेंट करण्यासाठी पेमेंट सेक्शनवर सर्व माहिती उपलब्ध असल्याचं अ‍ॅपलने ब्लॉग द्वारे स्पष्ट केलं आहे.

..ॲपल तंत्रज्ञान अग्रणी:

ॲपल ही कॅलिफोर्निया स्थित अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. इलेक्ट्रॉनिक्स, संगणक सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन सेवा विकसित करुन विक्री करण्यास अग्रभागी आहे. ॲपलच्या हार्डवेर उत्पादनात आयफोन स्मार्टफोन, आयपॅड टॅब्लेट कम्प्युटर, मॅक पर्सनल कॉम्प्युटर, आयपॉड पोर्टेबल मीडिया प्लेअर, ऍपल वॉच स्मार्टवाच, ऍपल टीव्ही डिजिटल मीडिया प्लेयर आणि होमपॉड स्मार्ट स्पीकर यांचा समावेश होतो.