Apple लवकरच LCD डिस्प्लेसह iPhone SE3 लाँच करणार, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?

| Updated on: Oct 23, 2021 | 7:20 PM

क्यूपर्टिनो आधारित टेक जायंट Apple 2022 मध्ये एलसीडी डिस्प्ले, अपग्रेडेड कनेक्टिव्हिटी आणि इंटर्नलसह नवीन आयफोन एसई मॉडेल लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

Apple लवकरच LCD डिस्प्लेसह iPhone SE3 लाँच करणार, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : क्यूपर्टिनो आधारित टेक जायंट Apple 2022 मध्ये एलसीडी डिस्प्ले, अपग्रेडेड कनेक्टिव्हिटी आणि इंटर्नलसह नवीन आयफोन एसई मॉडेल लॉन्च करण्याची योजना आखत आहे. GSMArena च्या अहवालानुसार, नवीन फोनमध्ये एक नवीन चिपसेट असेल जो 5nm A15 Bionic सह 5G नेटवर्कला सपोर्ट करेल. चीन आणि जगभरातील iPhone SE (2020) प्रमाणेच या फोनची किंमत 399 डॉलर्स असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Apple will soon launch iPhone SE3 with LCD display, check all details)

फॉर्म फॅक्टरच्या अपेक्षा असूनही, नवीन डिव्हाइस iPhone XR डिझाइनवर आधारित असेल. Apple iPhone SE3 मध्ये iPhone SE 2020 मध्ये पाहायला मिळालेली 4G ऐवजी 5G कनेक्टिव्हिटी असेल. अपग्रेडेड इंटर्नलसह स्मार्टफोन अधिक चांगल्या परफॉर्मन्ससह येण्याची अपेक्षा आहे. आगामी iPhone मध्ये खाली आणि वरच्या बाजूला बेझल्ससह 4.7-इंच LCD, अॅल्युमिनियम बॉडीमध्ये टच-आयडी सेन्सर/होम बटण असण्याची अपेक्षा आहे.

SE3 चे उत्पादन डिसेंबर 2021 च्या आसपास सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. iPhone SE (2020) Apple च्या A13 बायोनिक चिपसेटद्वारे थर्ड जनरेशन न्युरल इंजिनसह ए13 बायोनिक चिपसेटद्वारे ऑपरेटेड आहे. यामध्ये मागच्या बाजूला दोन कॅमेरे दिली जातील, तर सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

iPhone 13 सिरीजचे स्पेसिफिकेशन्स

नवीन आयफोन मागील मॉडेल आयफोन 12 पासून इन्स्पायर्ड आहे. यात नवीन A15 बायोनिक चिप, रिडिजाइन केलेले कॅमेरा मॉड्यूल आणि 120Hz रिफ्रेश रेटसह दमदार डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन 13 सिरीज एक वाईड नॉच, IP68 रेटिंग, मेटल-ग्लास बॉडी आणि फेस आयडी बायोमेट्रिक सिस्टम सह येतो.

मिनी व्हेरियंटमध्ये 5.4-इंच फुल एचडी+ (1080 × 2340 पिक्सल) ओएलईडी स्क्रीन आहे, तर आयफोन 13 आणि 13 प्रो मध्ये 6.1-इंच फुल एचडी+ (1170 × 2532 पिक्सल) ओएलईडी डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 120Hz, 6.7-इंच फुल-एचडी+ (1284 × 2778 पिक्सेल) OLED पॅनल आहे.

आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 मध्ये 12MP प्रायमरी सेन्सर आहे आणि रियर कॅमेरा 12 एमपीच्या अल्ट्रा-वाइड लेन्ससह आहे. दोन्ही प्रो मॉडेल मागील बाजूस ट्रिपल कॅमेरासह येतात.

iPhone 13 सिरीजची भारतातील किंमत

अलीकडेच लॉन्च झालेला आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनीची किंमत अनुक्रमे 79,900 आणि 69,900 रुपयांपासून सुरू होते. या किंमती बेस स्टोरेज मॉडेलसाठी 128GB आहेत. आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स अनुक्रमे 1,19,900 आणि 1,29,900 रुपयांना उपलब्ध असतील.

इतर बातम्या

स्ट्राँग बॅटरी, रिव्हर्स चार्जिंगसह Vivo Y3s (2021) भारतात लाँच, किंमत 9499 रुपयांहून कमी

दमदार प्रोसेसर, फास्ट चार्जरसह Realme चे दोन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

Samsung ची विक्री जैसे थे, तरीही ठरला जगातील अव्वल स्मार्टफोन ब्रँड, Apple, Xiaomi ला पछाडलं

(Apple will soon launch iPhone SE3 with LCD display, check all details)