स्ट्राँग बॅटरी, रिव्हर्स चार्जिंगसह Vivo Y3s (2021) भारतात लाँच, किंमत 9499 रुपयांहून कमी

Vivo Y3s (2021) भारतात लाँच झाला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे.

स्ट्राँग बॅटरी, रिव्हर्स चार्जिंगसह Vivo Y3s (2021) भारतात लाँच, किंमत 9499 रुपयांहून कमी
Vivo Y3s (2021)

मुंबई : Vivo Y3s (2021) भारतात लाँच झाला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे, जी रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते. हा स्मार्टफोन आकर्षक रंगांसह सादर करण्यात आला आहे. यात ग्रेडियंट बॅक पॅनल फिनिश आहे. (Vivo Y3s 2021 launched in India, know price and features)

Vivo Y3s (2021) ची किंमत 9490 रुपये आहे, यामध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज मॉडेल येते. हा स्मार्टफोन पर्ल व्हाईट, मिंट ग्रीन आणि स्ट्रे ब्लू या तीन रंगांमध्ये येतो. हा फोन आजपासून व्हिवो इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट, Amazon , टाटा क्लिक आणि पेटीएम इत्यादी प्लॅटफॉर्मवर विकला जाईल.

Vivo Y3s (2021) चे स्पेसिफिकेशन्स

Vivo चा हा बजेट स्मार्टफोन Android 11 Go Edition आधारित Funtouch 11 OS वर काम करेल. तसेच, यात 6.51 इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे, जो एलसीडी वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह येतो. तसेच, याचे रिझोल्यूशन 720 × 1,600 पिक्सेल इतके आहे. या फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. अधिक स्टोरेज आवश्यक असल्यास वापरकर्ते 1 टीबी पर्यंत एसडी कार्ड जोडू शकतात.

Vivo Y3s (2021) चा कॅमेरा सेटअप

Vivo Y3S (2021) च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, यात बॅक पॅनलवर एकच कॅमेरा आहे. जो 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यामध्ये f / 2.2 अपर्चर सेन्सर आहे. तसेच, यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रिव्हर्स चार्जिंगसह दमदार बॅटरी

या विवो स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे आणि कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी सिंगल चार्जवर 19 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग फीचर आहे, ज्याच्या मदतीने इतर फोनही चार्ज करता येतात.

इतर बातम्या

12GB/256GB, 50MP बॅक, 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X70 स्मार्टफोन बाजारात, किंमत…

फेसबुकवर पोस्ट करताना विचार करा, नव्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई, पब्लिक फिगर्सवरील टीका रोखण्याचा कंपनीचा प्रयत्न

Xiaomi च्या स्लिम, लाइटवेट 5G फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

(Vivo Y3s 2021 launched in India, know price and features)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI