इंटरनेट जगतात खळबळ, 77 कोटी ईमेल आयडी हॅक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

मुंबई : इंटरनेट जगताला हादरवाणरी बातमी ‘ट्रॉय हंट’ या ऑस्ट्रेलियन वेब सिक्युरिटी एक्स्पर्टने स्वत:च्या वेबसाईटवरुन प्रसिद्ध केलीय. तब्बल 77 कोटी 30 लाख ईमेल आयडी आणि 2 कोटींहून अधिक पासवर्डचा डेटा लीक झाल्याचा खळबळजनक दावा ‘ट्रॉय हंट’ने केला आहे. ‘ट्रॉय हंट’च्या वृत्तातील आकडेवारीनुसार, एकूण 772,904,991 ईमेल आयडी आणिएकूण  21,222,975 पासवर्ड लीक झाले आहेत. हा डेटा जगातील वेगवेगळ्या युजर्सकडून चोरण्यात […]

इंटरनेट जगतात खळबळ, 77 कोटी ईमेल आयडी हॅक
Follow us on

मुंबई : इंटरनेट जगताला हादरवाणरी बातमी ‘ट्रॉय हंट’ या ऑस्ट्रेलियन वेब सिक्युरिटी एक्स्पर्टने स्वत:च्या वेबसाईटवरुन प्रसिद्ध केलीय. तब्बल 77 कोटी 30 लाख ईमेल आयडी आणि 2 कोटींहून अधिक पासवर्डचा डेटा लीक झाल्याचा खळबळजनक दावा ‘ट्रॉय हंट’ने केला आहे.

‘ट्रॉय हंट’च्या वृत्तातील आकडेवारीनुसार, एकूण 772,904,991 ईमेल आयडी आणिएकूण  21,222,975 पासवर्ड लीक झाले आहेत. हा डेटा जगातील वेगवेगळ्या युजर्सकडून चोरण्यात आलेला आहे.

तुमचा ईमेल आयडी हॅक झालाय? चेक करा….

तुमचा ईमेल आयडी किंवा पासवर्ड हॅक झाला आहे की नाही, हे तुम्हाला सुद्धा चेक करता येईल. त्यासाठी ‘ट्रॉय हंट’ने एक वेबसाईट दिली आहे. ‘Have I Been Pwned‘ असे वेबसाईटचे नाव आहे. यावर तुम्ही क्लिक करुन, तिथे दिलेल्या रकानात्या तुमचा ईमेल आयडी टाईप करा आणि त्यानंतर ईमेल आयडी हॅक झालंय की नाही, ते तातडीने कळेल.

जर ईमेल आयडी सुरक्षित असेल, तर ‘Good news—- no pwnage found!’ असं लिहिलेले दिसेल. जर ईमेल आयडी हॅक झालं असेल, तर ‘Oh no—pwned’ लिहिलेलं दिसेल. जर तुमचा आयडी सुरक्षित नसेल तर तातडीने पासवर्ड आणि त्याच्या संबंधित डिटेल्स अपडेट करुन घ्या.