Asus ExpertBook Ultra, P3 आणि P5 सिरीजचे लॅपटॉप भारतात लॉन्च, फीचर्स वाचून थक्क व्हाल

Asus Expertbook Ultra : आसुसने भारतात आपल्या नवीन ExpertBook Ultra, P3आणि P5 सीरिजचे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. याची किंमत आणि फीचर्स सविस्तर जाणून घेऊयात.

Asus ExpertBook Ultra, P3 आणि P5 सिरीजचे लॅपटॉप भारतात लॉन्च, फीचर्स वाचून थक्क व्हाल
asus expertbook ultra
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 24, 2026 | 2:35 PM

आसुसने भारतात आपल्या नवीन ExpertBook Ultra, P3आणि P5 सीरिजचे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. ही नवीन रेंज खास करून एआय फीचर्स आणि हलके डिझाइन लक्षात ठेऊन बाजारात आणण्यात आली आहे. कंपनीने या लॅपटॉप्समध्ये इंटेल कोर अल्ट्रा प्रोसेसर, उत्तम बॅटरी आणि उच्च दर्जाच्या डिस्प्लेवर भर दिला आहे. विशेष म्हणजे, हे डिव्हाइसेस Copilot Plus PC श्रेणीत येतात, जे व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. या सर्व डिव्हाईसबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

किंमत आणि ऑफर्स

भारतात ExpertBook Ultra ची सुरुवातीची किंमत 2,39,990 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये इंटेल कोर अल्ट्रा X7 सिरीज 3 प्रोसेसर मिळतो. हा लॅपटॉप मॉर्न ग्रे आणि जेट फॉग या रंगांमध्ये उपलब्ध आहे. ExpertBook P3 सिरीजची सुरुवातीची किंमत 94,990 रुपये आहे, तर P5 सिरीजची सुरुवातीची किंमत 2,14,990 रुपये आहे.

सर्व मॉडेल्स फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. Ultra मॉडेलसाठी प्री-ऑर्डर सुरू झाली आहे. 29 एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या ऑफरमध्ये 5 वर्षांची वॉरंटी, बॅटरी कव्हर, अॅक्सिडेंटल डॅमेज प्रोटेक्शन, तसेच 20,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस मिळत आहे.

ExpertBook Ultra: हलके डिझाइन आणि दमदार एआय परफॉर्मन्स

ExpertBook Ultra हा या सिरीजमधील सर्वात प्रीमियम आणि हलका लॅपटॉप आहे, ज्याचे वजन सुमारे 0.99 किलो पासून सुरू होते. यामध्ये 14 इंच WQXGA+ OLED किंवा टँडेम OLED टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे, ज्याची ब्राइटनेस 1400 निट्स पर्यंत जाते. हा लॅपटॉप इंटेल कोर अल्ट्रा सिरीज 3 प्रोसेसर आणि इंटेल Arc ग्राफिक्ससह येतो. यात 64GB पर्यंत RAM आणि 2TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. या लॅपटॉपमध्ये AI Boost NPU दिले आहे, जे 50 TOPS पर्यंत परफॉर्मन्स देते. याशिवाय Dolby Atmos, 6 स्पीकर सेटअप, 1080p कॅमेरा आणि मजबूत सिक्युरिटी फीचर्सही मिळतात.

P3 आणि P5 सिरीज: बिझनेस युजर्ससाठी स्मार्ट पर्याय

ExpertBook P3 आणि P5 सिरीज वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आल्या आहेत. या लॅपटॉप्समध्ये 14 इंच आणि 16 इंच डिस्प्ले पर्याय मिळतात. काही मॉडेल्समध्ये अँटी-ग्लेअर डिस्प्ले तर काहींमध्ये OLED स्क्रीन दिली आहे. P3 सिरीजमध्ये इंटेल कोर अल्ट्रा 5 आणि 7 प्रोसेसर आहेत, तर P5 सिरीजमध्ये नवीन अल्ट्रा 7 प्रोसेसर आणि एआय सपोर्ट दिला आहे. यामध्ये 32GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. तसेच AI ExpertMeet आणि MyASUS सारखी टूल्स दिली आहेत, ज्यामुळे काम अधिक सोपे होते.

कनेक्टिव्हिटी, बॅटरी आणि सिक्युरिटी फीचर्स

नवीन ExpertBook सिरीजमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 7, Bluetooth 5.4, Thunderbolt 4, USB पोर्ट्स आणि HDMI 2.1 सारखे फीचर्स दिले आहेत. ExpertBook Ultra मध्ये 70Wh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. ही बॅटरी पॉवरबँकद्वारे चार्ज करता येते. तर P3 आणि P5 मॉडेल्समध्ये वेगवेगळे बॅटरी आणि चार्जिंग पर्याय उपलब्ध आहेत. सिक्युरिटीसाठी सर्व लॅपटॉप्समध्ये TPM सपोर्ट, फिंगरप्रिंट सेन्सर, IR कॅमेरा आणि BIOS प्रोटेक्शन दिले आहेत. याशिवाय, हे सर्व डिव्हाइसेस मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटीसह येतात, त्यामुळे ते दीर्घकाळ टिकाऊ ठरतात.

 

Follow Us