तुम्हीसुद्धा गुगलवर करता का या गोष्टी सर्च, जावे लागू शकते तुरूंगात

भारतासह काही देशांमध्ये या गोष्टींचा शोध तुम्ही गुगलवर घेतल्यास तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. तुम्ही दोषी आढळल्यास तुम्हाला तुरुंगातही पाठवले जाऊ शकते.

तुम्हीसुद्धा गुगलवर करता का या गोष्टी सर्च, जावे लागू शकते तुरूंगात
गुगल
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 22, 2023 | 8:06 PM

मुंबई : तुम्हाला जवळपास प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गुगलवर मिळते, मात्र  काही गोष्टी अशा आहेत ज्या शोध तुम्ही गुगलवर (Ban content on Google) घेण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला तुरूंगवारी करावी लागू शकते. आता तुम्ही म्हणाल हे काय भलतेचं? मात्र हे खरे आहे. भारतासह काही देशांमध्ये या गोष्टींचा शोध तुम्ही गुगलवर घेतल्यास तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. तुम्ही दोषी आढळल्यास तुम्हाला तुरुंगातही पाठवले जाऊ शकते. जर तुम्हीही बेजबाबदारपणे गुगल सर्चमध्ये काहीही शोधू लागलात तर आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्याची माहिती गुगलवर शोधणे महागात पडू शकते.

बॉम्ब कसा बनवायचा

जर तुम्ही गुगल सर्चवर बॉम्ब कसा बनवायचा याचा शोध घेत असाल तर तुम्हाला हे कळायला हवे की हा एक संवेदनशील मुद्दा आहे, भारतीय सुरक्षा यंत्रणा अशा गुगल सर्चवर लक्ष ठेवतात. असे करताना आढळल्यास तुम्हाला न्यायालयाच्या चकरा माराव्या लागू शकतात आणि दोषी आढळल्यास तुरुंगातही जावे लागू शकते. त्यामुळे गुगलवर फक्त गंमत म्हणून असे काहीही सर्च करू नका.

बाल गुन्हेगारी

लहान मुलांची प्रतिमा हा एक विषय कसा आहे जो भारतातील संवेदनशील मुद्दा मानला जातो, या विषयावर ऑनलाइन भरपूर सामग्री उपलब्ध आहे, परंतु जर एखाद्या व्यक्तीने मनोरंजनासाठी बालगुन्हेगारीशी संबंधित कोणताही मजकूर शोधला तर भारत सरकार अशा व्यक्तीवर कारवाई करू शकते.

महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित सामग्री

अनेक लोक महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित सामग्री शोधतात, मग ते व्हिडिओ असो किंवा छायाचित्रे, जर तुम्ही असा मजकूर शोधला तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते आणि तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता.

शस्त्रास्त्रांची माहिती

शस्त्रास्त्रांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही दररोज गुगलवर सर्च केल्यास, सतत असे केल्याने तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते, कारण अनेक गुन्हेगारांना अशाप्रकारे शस्त्रास्त्रांची माहिती असते आणि नंतर ती अवैध मार्गाने मिळवून चुकीच्या कामात वापरतात. ही सामग्री शोधल्याने तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.