International Women’s Day 2021 | जगात महिलांचे स्थान उल्लेखनीय, गुगलकडून नारीशक्तीचा अनोखा सन्मान

गुगलने डुडलच्या माध्यामातून एका अनोख्या पद्धतीने स्त्री शक्तीला सलाम केला आहे. (Google Doodle celebrates International Women’s Day 2021)

International Women's Day 2021 | जगात महिलांचे स्थान उल्लेखनीय, गुगलकडून नारीशक्तीचा अनोखा सन्मान
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 6:35 AM

मुंबई : जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (International Women’s Day 2021) म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गुगलने अनोख्या पद्धतीचे डुडल (Google Doodle) साकारलं आहे. या डुडलच्या माध्यमातून गुगलने जगातील सर्व नारी शक्तीचा सन्मान केला आहे. (Google Doodle celebrates International Women’s Day 2021)

महिला दिनाच्या निमित्ताने गुगल व्हिडिओद्वारे हे खास डुडल बनवण्यात आलं आहे. ज्यात अॅनिमेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला दाखवल्या आहेत. यात विज्ञान, कला, क्रिडा, मनोरंजन, मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. या गुगलने डुडलच्या माध्यामातून एका अनोख्या पद्धतीने स्त्री शक्तीला सलाम केला आहे.

काय आहे खास?

गुगलने महिला दिनानिमित्त साकारलेल्या डुडलमध्ये सुरुवातीला काही महिलांचे हात एकमेकांच्या हातात दिसत आहेत. त्यानंतर जगभरातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे हात दाखवण्यात आले आहेत. या डूडलमध्ये महिलांच्या हातांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात महिलांचे पहिले मतदान, विज्ञान क्षेत्रातील काम, लेखिका, प्रवक्त्या, निवेदिका, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला दिसत आहे.

आज जगात सर्वच ठिकाणी महिला घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे जगात महिलांचे उल्लेखनीय स्थान निर्माण झाले आहे. अशा महिलांना गुगलने डुडलच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. (Google Doodle celebrates International Women’s Day 2021)

जागतिक महिला दिनाची सुरुवात

सर्वात पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरुवात 28 फेब्रुवारी 1909 रोजी करण्यात आली. महिला दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघात एक थीम तयार करण्यात आली होती. जागतिक महिला दिनाची पहिली थीम सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर ठेवली होती. विशेष म्हणजे प्रत्येकवर्षी जागतिक महिला दिवस साजरा करताना एक विशेष थीम बनवण्यात येते.

1910च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत एक ठराव मांडण्यात आला होता. त्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (International Women’s Day) म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. समाजातील महिलांना समान अधिकार देणे आणि सन्मान करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. (Google Doodle celebrates International Women’s Day 2021)

संबंधित बातम्या :

Happy Women’s Day Wishes in Marathi: Video: महिला दिनाच्या दिवशी जर एक व्हिडीओ पाहायचा ठरवला तर कोणता निवडाल? आमच्या दृष्टीनं तो हाच !

International Women’s Day : निता अंबानींचे महिलांसाठी खास ‘Her Circle’, कसं करणार काम?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.