बीएमडब्ल्यूचं नवं मॉडल भारतात लाँच, किंमत तब्बल…

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

नवी दिल्ली : जर्मनीची प्रमुख कार निर्मिती कंपनी बीएमडब्ल्यूने (BMW) भारतीय बाजारात आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. तसेच कंपनीने 2019 मध्ये नवीन मॉडल BMW Z4 Roadster लाँच केलं आहे. कंपनीने हे मॉडल दोन व्हेरिअंटमध्ये बाजारात उतरवलं आहे. sDrive20i आणि Z4 M40i असे दोन व्हेरिअंटमध्ये आहेत. या दोन्ही व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 60 आणि 80 लाख […]

बीएमडब्ल्यूचं नवं मॉडल भारतात लाँच, किंमत तब्बल...
Follow us on

नवी दिल्ली : जर्मनीची प्रमुख कार निर्मिती कंपनी बीएमडब्ल्यूने (BMW) भारतीय बाजारात आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. तसेच कंपनीने 2019 मध्ये नवीन मॉडल BMW Z4 Roadster लाँच केलं आहे. कंपनीने हे मॉडल दोन व्हेरिअंटमध्ये बाजारात उतरवलं आहे. sDrive20i आणि Z4 M40i असे दोन व्हेरिअंटमध्ये आहेत. या दोन्ही व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 60 आणि 80 लाख रुपये आहे.

लक्झरी आणि महागड्या कारमध्ये बीएमडब्ल्यू कंपनीच्या गाड्यांचा समावेश होतो. बीएमब्ल्यूच्या प्रत्येक कार आणि बाईक्स या महाग असतात. कंपनीने नुकतेच भारतामध्ये आपल्या कारचं लाँचिंग केलं आहे आणि त्यांच्या किमतीतही कंपनीने वाढ केली आहे.

बीएमडब्ल्यूची नवीन कार टूसीटर आहे आणि कंपनीने या गाडीच्या Z4 M40i व्हेरिअंटमध्ये 3.0 लीटर क्षमता असलेला इनलाइन 6 सिलेंडर युक्त टर्बो इंजिन दिले आहे. यामुळे कार 340 बीएचपी पॉवर आणि 500 एनएमचा टॉर्क जनरेट करते.

sDrive20i व्हेरिअंटमध्ये कंपनीने 2.0 लीटर क्षमतेचे 4 सिलेंडर युक्त टर्बो इंजिनचा प्रयोग केला आहे. यामुळे कार 197 बीएचपी पॉवर आणि 320 एनएमचा टॉर्क जनरेट करते. तसेच गाडीच्या sDrive20i मध्ये कंपनीने छोट्या इंजिनचा वापर केला आहे. कंपनीने दोन्ही व्हेरिअंटमध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिले आहेत.

Z4 M40i व्हेरिअंट 4.5 सेंकदमध्ये 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. याशिवाय या कारचा टॉप स्पीड 250 किलोमीटर आहे आणि ही कार 12.82 प्रतिलीटर मायलेज देते. तर sDrive20i व्हेरिअंट 6.6 सेकंदमध्ये 100 किलोमीटर वेगाने धावू शकते. या कारचा टॉप स्पीड 240 किलोमीटर प्रतितास आहे. या कारला छोटे इंजिन असल्यामुळे 14.37 मायलेज देते.