APPLE ला धक्का, या देशात iphone विक्रीवर लावण्यात आली बंदी, याचं कारणंही तुम्हाला आवडेल?

| Updated on: Sep 07, 2022 | 7:04 PM

ॲपलच्या लेटेस्ट मॉडेल्ससह iPhone 12 आणि त्यानंतरच्या सर्व मॉडेल्सवर बंदी घालण्याचा निर्णय ब्राझील सरकारने घेतला. कंपनी मोबाईलसह चार्जर देत नसल्याने ब्राझील सरकारने हा निर्णय घेतला आहे.

APPLE ला धक्का, या देशात iphone विक्रीवर लावण्यात आली बंदी, याचं कारणंही तुम्हाला आवडेल?
iPhone
Follow us on

नवी दिल्ली : ॲपलच्या(APPLE ) आयफोनची( iPhones) जगभरात चांगलीच क्रेज आहे. यामुळे अनेक जण आयफोनचे नविन मॉडेल्स लाँच होण्याच्या प्रतिक्षेत असतात. मात्र, ॲपलकंपनीने आयफोनची विक्रि करताना चार्जर ने देण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक युजर्स नाराज झाले आहेत. ब्राझील या देशाने तर iphone विक्रीवर बंदी लावण्याचाच निर्णय घेतला आहे.

ॲपलच्या लेटेस्ट मॉडेल्ससह iPhone 12 आणि त्यानंतरच्या सर्व मॉडेल्सवर बंदी घालण्याचा निर्णय ब्राझील सरकारने घेतला. कंपनी मोबाईलसह चार्जर देत नसल्याने ब्राझील सरकारने हा निर्णय घेतला आहे.

स्थानिक न्यूज संस्था द व्हर्जने याबाबतचे वृत्त दिले आहे. ब्राझील सरकारने चार्जरसह पॅक न केलेल्या iPhones ची विक्री तातडीने थांबवली आहे. ब्राझिलच्या न्याय मंत्रालयाने Apple ला 12.275 दशलक्ष रियासचा ($2.38 दशलक्ष) दंड देखील ठोठावला आहे.

ब्राझील सरकारने ॲपल कंपनीला iPhone 12 आणि नवीन मॉडेल्सची विक्री रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. चार्जर नसलेल्या सर्व iPhoneचे मॉडेल्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

ॲपलने iPhone 12 लाँच केल्यावर फोनसह चार्जर देणे बंद केले. फोनसह फक्त एक चार्जींग केबल दिली जाते. यामुळे ग्राहकांना 1800 रुपये खर्च करुन अडाप्टर वेगळा विकत घ्याला लागतो. यामुळे ग्राहकांना वेगळा आर्थिक भुर्दंड बसत आहे. यामुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ग्राहकांच्या या तक्रारीची दखल घेत ब्राझील सरकारने कंपनीला दणका दिला आहे. चार्जरशिवाय येणार iPhones वर बंदी घालण्यात आली.

दरम्यान, आजा 7 सप्टेंबर रोजी अॅप्पलचा मेगा इव्हेंट होणार आहे. या इव्हेंटमध्ये iPhone 14 लाँच होणार आहे. iPhone 14 सीरिजव्यतिरिक्त, स्मार्टवॉचसह इतर प्रोडक्टच्या लाँचींगची घोषणा होणार आहे.