400 रुपयांमध्ये 400 GB डेटा, ‘ही’ कंपनी देतेय खास ऑफर
अलिकडेच एका टेलिकॉम कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. यात 400 रुपयांमध्ये 400 जीबी डेटा दिला जात आहे

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील टेलिकॉम कंपन्या खास ऑफर्स आणत असतात. कमी पैशांमध्ये जास्त फायदे दिल्यास ग्राहक आपोआप आकर्षित होतात. अलिकडेच बीएसएनएल कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. यात 400 रुपयांमध्ये 400 जीबी डेटा दिला जात आहे. ही ऑफर मर्यादिक काळासाठी असल्याने ती लवकरच संपणार आहे. या ऑफरचा फायदा कसा घ्यायचा? ही ऑफर किती दिवस सुरु आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बीएसएनएलने संपूर्ण देशात 90 हजार 4 जी टॉवर उभारले आहेत, या निमित्ताने बीएसएनएलकडून ही खास ऑफर दिली जात आहे. तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास तु्म्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर आणि कंपनीच्या सेल्फ केअर अॅपद्वारे 400 रुपयांमध्ये 400 GB डेटा या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
ऑफर किती दिवस सुरु राहणार?
बीएसएनएलने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. यानुसार ही ऑफर 1 जुलै पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खुप कमी वेळ शिल्ल्क आहे. जर तुमच्याकडे बीएसएनएलचे सिमकार्ड असेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. महत्वाची बाब म्हणजे हा फक्त एक डेटा पॅक आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा व्यतिरिक्त कॉलिंग किंवा एसएमएसचा फायदा मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळा रिचार्ज करावा लागेल.
व्हॅलिडिटी किती दिवस?
बीएसएनएलचा 400 रुपयांमध्ये 400 GB डेटा या प्लॅनमध्ये तुम्हाला 40 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या डेटा पॅकमध्ये दैनिक मर्यादा नसेल, म्हणजेच तुम्ही एका दिवशात अमर्यादित डेटा वापरू शकता.महत्वाची बाब म्हणजे 400 जीबी डेटा वापरल्यानंतर, इंटरनेट स्पीड 40 केबीपीएसपर्यंत कमी होईल.
एअरटेल-जियोकडेही खास डेटा प्लॅन
इंटरनेट डेटासाठी एअरटेलकडे 451 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये फक्त 50 जीबी डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. तर रिलायन्स जिओकडे 359 रुपयांचा प्लॅन आहे, या प्लॅनमध्येही 50 जीबी डेटा मिळतो, याची व्हॅलिडिटीही 30 दिवसांची आहे. याचाच अर्थ बीएसएनएल आपल्या ग्राहकांना कमी पैशांमध्ये जास्त डेटा आणि व्हॅलिडिटीही देत आहे.
