बीएसएनएलची नवी ऑफर, केवळ 19 रुपयात तगडा इंटरनेट प्लॅन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल या टेलिकॉम कंपनीने नवा प्लॅन आणला आहे. बीएसएनल आता ग्राहकांना फक्त 19 रुपयांत तब्बल 2 जीबी इंटरनेट देणार आहे. याचा फायदा बीएसएनएल वायफाय हॉटस्पॉट वापरणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. कशी असेल ऑफर? सध्या देशभरात बीएसएनएलचे 16  हजार 300 ठिकाणी जवळपास 30 हजार 400 वायफाय हॉटस्पॉट आहेत. यातील अनेक हॉटस्पॉट ग्रामीण भागात […]

बीएसएनएलची नवी ऑफर, केवळ 19 रुपयात तगडा इंटरनेट प्लॅन
Follow us on

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल या टेलिकॉम कंपनीने नवा प्लॅन आणला आहे. बीएसएनल आता ग्राहकांना फक्त 19 रुपयांत तब्बल 2 जीबी इंटरनेट देणार आहे. याचा फायदा बीएसएनएल वायफाय हॉटस्पॉट वापरणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे.

कशी असेल ऑफर?

सध्या देशभरात बीएसएनएलचे 16  हजार 300 ठिकाणी जवळपास 30 हजार 400 वायफाय हॉटस्पॉट आहेत. यातील अनेक हॉटस्पॉट ग्रामीण भागात असल्याने त्याचा उपयोग विद्यार्थी, नागरिकांना होतो. या हॉटस्पॉटचा वापर वाढावा या दृष्टीने बीएसएनएलद्वारे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे व्हाऊचर काढण्यात आले आहेत. या व्हाऊचरची किंमत 19 रुपये, 39 रुपये, 59 रुपये, 69 रुपये अशी आहे. यात 19 रुपयाच्या व्हाऊचरमध्ये 2 जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे. याची वैधता फक्त दोन दिवस असेल.

बीएसएनएलतर्फे देण्यात येणाऱ्या 39 रुपयांच्या व्हाऊचरमध्ये 7 जीबी डेटा मिळणार आहे. ज्याची वैधता 7 दिवस आहे. तर 59 रुपयाच्या वायफाय डेटा व्हाऊचरमध्ये 15 जीबी इंटरनेट मिळणार असून त्याची वैधता 15 दिवसांची असेल. या तीन प्लॅनसह आणखी एक 69 रुपयांचे व्हाऊचर देण्यात येणार आहे. या व्हाऊचरची वैधता 28 दिवसांकरिता असून त्यात 30 जीबी डेटा मिळणार आहे.

या वायफाय हॉटस्पॉटचा रिचार्ज करण्यासाठी बीएसएनएलच्या वेबसाईटवर एक वेगळे पेज तयार करण्यात आले आहे. या पेजवर जाऊन युजर्स डेबिट-क्रेडीट कार्ड, नेटबँकिंगद्वारे रिचार्ज करु शकतात. त्याशिवाय या वेबपेजवर आपल्या जवळील वायफाय हॉट्स्पॉटचे ठिकाण कळणार आहे.

बीएसएनएलने गेल्यावर्षी ऑगस्ट 2017 पासून मार्च 2019 पर्यंत संपूर्ण जगभरात एक लाख वायफाय हॉटस्पॉट लावण्याचे लक्ष ठेवले होते. तर ग्रामीण भागात 25 हजार वायफाय हॉटस्पॉट लावण्याचे लक्ष ठेवले होते.