
Realme 12+ 5G हा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. 8GB रॅम/128GB स्टोरेजची किंमत 20,999 रुपये इतकी आहे. तर 8GB रॅम/256GB स्टोरेजची किंमत 21,999 रुपये आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2000 निट्स पीक ब्राईटनेससह 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7050 चिपसेट असेल.

OnePlus Nord CE 4 5G, दोन व्हेरिएंटमध्ये मिळेल. 8GB रॅम/128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. तर 8GB रॅम/256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 26,999 रुपये इतकी आहे. या मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, HDR 10+ कलर सर्टिफिकेशन आणि 10-बिट कलर डेप्थसह 6.7-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळेल.

Nothing Phone (2a) हा ट्रान्सपरंट डिझाईन फोन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन, 6.7 इंचाचा फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले, याशिवाय 1080×2412 (FHD+) रिझॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅपलिंग रेट सारखे फीचर्स आहेत.

Poco X5 Pro च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडलची किंमत 22,999 रुपये आहे. तर 8GB रॅम/256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट आणि एड्रेनो 642L GPU आहे. स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा Xfinity AMOLED डिस्प्ले आहे.

Samsung Galaxy A34 5G मध्ये 2340×1080 पिक्सल रिझोल्यूशन्ससह 6.60 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे. हा फोन ग्राहकांना 6GB वा 8GB रॅम पर्यायामध्ये मिळेल. या फोनची बॅटरी 5000mAh इतकी आहे.