
Bumper Sale on Realme Narzo News | तुम्हाला एखादा बजेट स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, आणि तुम्ही एखाद्या डिस्काउंटसाठी (Discount) वाट बघत असाल, तर तुमची प्रतीक्षा संपली आहे. तुम्ही अपघ्या पाचशे रुपयांमध्ये दहा हजारांचा स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहात. सुरुवातीला तुम्हाला आम्ही हे काय सांगतोय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. परंतु ही माहिती खरी आहे. जर तुम्ही स्मार्टफोन (smartphone) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण ॲमेझॉनवर (Amazon) सध्या बंपर सेल सुरु झाला आहे आणि या सेलमध्ये ग्राहकांना अतिशय वाजवी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन 4GB + 64GB व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ग्राहकांना 6.5 इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा HD+ डिस्प्ले आहे. तसेच यात 8MP प्रायमरी कॅमेरा तर 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Realme Narzo 50i या स्मार्टफोनवर पहिल्यांदाच बंपर सेल लागला आहे. Realme Narzo 50i ची एमआरपी किंमत 9,999 रुपये असून ग्राहक 10 टक्के डिस्काउंटनंतर हा स्मार्टफोन केवळ 8,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासोबतच या फोनवर अनेक ऑफर्सही सुरू आहेत. ग्राहक हा फोन एक्सचेंज ऑफरमध्ये देखील खरेदी करू शकता. निवडक क्रेडिट कार्डधारकांना या फोनवर नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील मिळत आहे. हा स्मार्टफोन 4GB + 64GB व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ग्राहकांना 6.5 इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा HD+ डिस्प्ले आहे. तसेच यात 8MP प्रायमरी कॅमेरा तर 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
फोनच्या बॅटरीबद्दल बोलूायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. हा फोन ऑक्टा कोअर प्रोसेसरवर काम करतो. यात Android 11 ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आहे. कंपनीकडून या फोनवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. या वॉरंटीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे मूळ बिल देखील असणे आवश्यक आहे. जर बिल नसेल, तर ग्राहकांना फोनची वॉरंटी मिळणार नाही.
स्पेसिफिकेशन्स – Unisoc SC9863A
डिस्प्ले – 6.5 इंच (16.51 सेमी)
स्टोरेज – 32 जीबी
कॅमेरा – 8 MP
बॅटरी – 5000 mAh
भारतात किंमत – 7499
रॅम – 2 जीबी
200 मेगापिक्सलसह (200 megapixel camera) नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात धुमाकूळ घालणार आहे. मोटोरोलाच्या या अपकमिंग स्मार्टफोनचा (Smartphone) फोटो समोर आला असून यात फोनला लाईव्ह पाहिले जाउ शकते. सोबत या नवीन स्मार्टफोनच्या कलर व्हेरिएंटचीही माहिती मिळत आहे. मोटोरोलाचा मालकी हक्क असलेली कंपनी लेनोवोच्या एका अधिकाऱ्यांनी या अपकमिंग मोबाईल फोनचे काही फोटो शेअर केले आहेत. लेनोवो एक्झीकेटीव्हतर्फे शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये तीन लेंस दिसून येत आहेत. यात एक मोठी लेंस असून अन्य दोन्ही सेकंड आणि थर्ड लेंस खूप लहान आहेत. कॅमेरा मॉड्यूलसाठी बंपचा वापर करण्यात आलेला असून त्यावर मेगापिक्सल एचपी 1 ओआईएस सेंसर लिहिले आहे. त्यामुळे हा फोटो 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनचा आहे, हे स्पष्ट होत आहे. यात एक एलईडी फ्लॅश लाइट्सचाही (LED flash lights) वापर करण्यात आलेला आहे.