AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5000mAh बॅटरीसह इनफिनिक्स नोट 12 लाँच, फ्लिपकार्टवर खास ऑफर…

तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर, 5000mAh बॅटरीसह इनफिनिक्स नोट 12 हा बजेट 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. यात, ग्राहकांना 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे.

5000mAh बॅटरीसह इनफिनिक्स नोट 12 लाँच, फ्लिपकार्टवर खास ऑफर...
5000mAh बॅटरीसह इनफिनिक्स नोट 12 लाँच
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 2:13 PM
Share

इनफिनिक्सने (Infinix) नुकताच भारतीय मोबाईल बाजारात दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीच्या या सिरीजच्या स्टंडर्ड प्रकाराची म्हणजेच इनफिनिक्स नोट 12 5जी (Infinix Note 12 5G) ची आजपासून पहिली विक्री करण्यात येत आहे. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart offer) खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने हा हँडसेट Infinix Note 12 Pro 5G सह लाँच केला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन ठरणार आहे. बजेट स्मार्टफोन असला तरी यात विविध नवीन आकर्षक फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आला आहे. या स्मार्टफोनला 6GB रॅम दिली असून यासह 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी सपोर्ट मिळणार आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे.

इनफिनिक्स नोट 12 5जी ची किंमत

कंपनीने हा फोन फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे. त्याच्या 6GB रॅम + 64GB स्टोरेज सोलो व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. ग्राहक फ्लिपकार्टवरून आज म्हणजेच 15 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून हँडसेट खरेदी करू शकतात. हा फोन ब्लॅक आणि व्हाईट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ॲक्सिस बेंक क्रेडिट कार्ड आणि ईएमआयवर 1500 रुपयांची सूट दिली असून एसबीआय कार्डवरही ऑफर आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

Infinix Note 12 5G ला 6.7 इंचाचा AMOLED डिसप्ले मिळत असून तो फुल एचडी + रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. डिसप्ले पॅनलची ब्राइटनेस 700 निट्‌सची आहे. सेफ्टीसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 वापरण्यात आला आहे. हँडसेट ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेंसिटी 810 प्रोसेसरवर काम करतो. यात 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. स्टोरेज 2TB पर्यंत वाढवण्याचा पर्याय आहे. डिव्हाइस Android 12 वर काम करतो.

ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याची मुख्य लेंस 50MP आहे. याशिवाय 2MP डेप्थ सेंसर आणि AI लेंस देण्यात आली आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 5000mAh बॅटरी उपलब्ध असून ती 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, स्टीरिओ स्पीकर आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक होल आहे.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.