डिजिटल शिधापत्रिका: तुमचं नावं ते रेशन तपशील, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

| Updated on: Dec 23, 2021 | 8:47 PM

शिधापत्रिकेत नाव नसलेल्या व्यक्तींना सार्वजनिक सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागते. तुमच्या शिधापत्रिकेतील नावं ते रेशन तपशील इथपर्यंतची सर्व माहिती आता तुम्ही घरबसल्या एका क्लिकवर तपासू शकतात.

डिजिटल शिधापत्रिका: तुमचं नावं ते रेशन तपशील, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
तुमचं नावं ते रेशन तपशील, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
Follow us on

नवी दिल्ली : शिधापत्रिकेचा वापर रेशनसहित अन्य महत्वाच्या कामांसाठी केला जातो. राष्ट्रीयकृत बँकांत खाते उघडण्यासाठी प्रमाणित कागदपत्र म्हणून शिधापत्रिकेचा समावेश होतो. तसेच शिधापत्रिकेत नाव नसलेल्या व्यक्तींना सार्वजनिक सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागते. तुमच्या शिधापत्रिकेमधील नावं ते रेशन तपशील इथपर्यंतची सर्व माहिती आता तुम्ही घरबसल्या एका क्लिकवर तपासू शकतात.

तपशील शोधण्याचे टप्पे

अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत शिधापत्रिकेची सुविधा दिली जाते.

तुमची व तुमच्या आप्तजणांची नावे शिधापत्रिकेत तपासण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या शिधापत्रिकेची वेबसाईट ओपन करावी लागेल.

तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असल्यास तुम्हाला fcs.maha.gov.in वेबसाईटवर क्लिक करावे लागेल.

वेबसाईटवर विविध प्रकारच्या कॅटेगरी तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला अपेक्षित असलेला जिल्हा यादीमधून निवडा. जिल्हा-तालुका-प्रभाग/गट-वार्ड याक्रमाने निवड करा.

तुम्हाला डिजिटल स्वरुपात तुमची शिधिपत्रिका प्राप्त होईल. तुमचे नाव तसेच आतापर्यंत प्राप्त रेशन यांचा तपशील तुम्हाला त्यावर दिसून येईल.

काही नि:शुल्क, काही सशुल्क

विविध राज्य सरकारांच्याद्वारे शिधापत्रिकेवर मोफत वस्तू वितरित केल्या जात आहेत. महाराष्ट्रातही विभिन्न श्रेणीतील शिधापत्रिकांवर रेशनची तरतूद करण्यात आली आहे. प्रति व्यक्ती नुसार गहू,तांदूळ, डाळ, साखर इ. उपलब्धतेनुसार वितरित केले जाते.

रेशनपासून वंचित, तक्रारीची हेल्पलाईन

पुरवठादारांकडून अपेक्षित प्रमाणात नागरिकांना धान्य उपलब्ध करुन दिले जात नाही. तसेच कोविडसारख्या आपत्कालीन स्थितीत सरकारने शिधापत्रिकेवर मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारच्या मोफत कोट्यातील धान्यासाठी देखील शुल्क आकारण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. अशावेळी नागरिक थेट पुरवठादारांकडे तक्रार करू शकतात. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या http://fcs.maharashtra.gov.in या वेबसाइटवर भेट देऊ शकता

कोणतं कार्ड कुणासाठी?

पिवळे रेशन कार्ड (बीपीएल)

प्रति वर्ष एकूण उत्पन्न

शहरी रु. 15000/-
दुष्काळग्रस्त भाग 11000/-
उर्वरित ग्रामीण भाग 15000/-

केशरी रेशन कार्ड (एपीएल)

वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी
4 चाकी वाहन स्व-मालकीचे नसावे
कौटुंबिक मालकीची जमीन 4 हेक्टरपेक्षा कमी

पांढरे रेशन कार्ड (प्रगत उन्नत लोकांसाठी)

वार्षिक उत्पन्न 1 लाखपेक्षा अधिक
चार चाकी असावी
कौटुंबिक मालकीची जमीन 4 एकर

इतर बातम्या

Know this | तुम्हाला हे माहितीये का? विधवा आईचा मयत मुलाच्या संपत्तीवर अधिकार

Business Idea | अवघ्या 4 लाखात सुरू करा ‘हा’ उद्योग, बना लखपती!