Airtel, Vi आणि Jio चा निवडा बेस्ट प्लान, प्रत्येक दिवसासाठी 2 जीबी डेटा आणि बरंच काही, जाणून घ्या

| Updated on: May 01, 2023 | 5:32 PM

तंत्रज्ञानाचं युग असून प्रत्येकाच्या हाती आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. पण डेटा शिवाय स्मार्टफोन काहीच कामाचा नाही असंच म्हणावं लागेल. त्यासाठी तुम्हाला काही बेस्ट प्लान सांगणार आहोत.

Airtel, Vi आणि Jio चा निवडा बेस्ट प्लान, प्रत्येक दिवसासाठी 2 जीबी डेटा आणि बरंच काही, जाणून घ्या
Airtel, Vi आणि Jio प्रीपेड प्लान रिफील करण्यापूर्वी आकर्षक स्किमबाबत जाणून घ्या, दररोज 2 जीबी डेटासह मिळतात या सुविधा
Follow us on

मुंबई : तुम्ही चालता फिरता, उठता बसता स्मार्टफोनचा वापर करता. खरं तस स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे पाच दहा मिनिटं आपल्या हाती फोन नसला की चुकल्यासारखं वाटतं. पण सर्वात वाईट गोष्ट म्हणजे स्मार्टफोन हातात असून त्यात आवश्यक डेटा नसेल तर मात्र फजिती होते. आज आम्ही तुम्हा व्होडाफोन आयडिया, एअरटेल, जिओ आणि बीएसएनएलचे बेस्ट मोबाईल डेटा प्लान सांगणार आहोत. यात तुम्हाला 2 जीबी डेटासह काही सुविधा देखील मिळणार आहेत. चला जाणून घेऊयात या प्लानबाबत

व्होडाफोन आयडिया 2 जीबी डेटा प्लान रिचार्ज

व्होडाफोन आयडिया लिमिटेडमध्ये काही कालावधीसाठी स्पेशल डबल डेटा ऑफर आहे. 299, 449 आणि 699 रुपयांचे डबल डेटा प्लान आहेत. या प्लानमध्ये 2 जीबी डेटा हायस्पीड मिळत होता. आता ऑफरनुसार काही कालावधीसाठी 4 जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता अनुक्रमे 28, 56 आणि 84 दिवस आहे. या तिन्ही प्लानमध्ये मोफत अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॅलिंगसह 100 डेली एसएमएसची सुविधा मिळते.

व्होडाफोन युजर्ससाठी 499 रुपयांचा Vodafone play आणि 999 रुपयांचा ZEE5 सब्स्क्रिप्शन मिळतं. दोन जीबी डेटा असलेला वर्षभराचा प्लान कंपनीकडे नाही.

एअरटेल 2 जीबी डेटा प्लान रिचार्ज

एअरटेलमध्ये सर्वात 2 जीबी डेटा प्लान 252.54 रुपयांपासून सुरु होतो. या प्लानमध्ये 2 जीबी हायस्पीड डेटा दररोज मिळतो. प्लानमध्ये मोफत अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॅलिंगसह 100 डेली एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता 28 दिवसांसाठी आहे. याबरोबर कंपनीचा 295.76 रुपयांचीही प्लान आहे. यात 252.54 रुपयांप्रमाणे सर्व सुविधा मिळतात. पण यात अमेझॉन प्राइमचं सब्सक्रिप्शन मिळते.

एअरटेलमध्ये 380.51 रुपये आणि 591.53 रुपयांचा प्लान आहे. यात 2 जीबी डेटासह मोफत अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंग, 100 मोफत एसएमएस सुविधा मिळते. 380.51 रुपयांच्या प्लानची वैधता 56 दिवस आणि 591.53 रुपयांच्या प्लानची वैधता 84 दिवस आहे. एअरटेलमध्ये 2116.95 रुपयांचा पूर्ण वर्षासाठी प्लान आहे. यात वर दिलेल्या सर्व सुविधा 365 दिवसांसाठी मिळतात.

रिलायन्स जिओ 2 जीबी डेटा प्लान रिचार्ज

जिओ ग्राहकांसाठी 249, 444, 599 आणि 2399 रुपयांचे चार प्लान 2 जीबी डेटासह आहे. यात तुम्हाला 100 मोफत एसएमएस आणि जिओ टू जिओ अनलिमिटेड मोफत कॉलिंग सुविधा मिळते. तर जिओ नेटवर्कवरून इतर नेटवर्कवर फोन लावला तर वरील प्लाननुसार अनुक्रमे 1000, 2000, 3000 आणि 12000 मिनिटं मिळतात. या प्लानची वैधता 28, 56, 84 आणि 365 दिवस अनुक्रमे आहे. या व्यतिरिक्त जिओकडे 2599 रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. यात 10 जीबी अतिरिक्त डेटा आणि डिस्ने हॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळते.