काहीही चार्जिंगला लावलेलं नसताना स्विच चालूच ठेवता? ही सवय तुम्हाला पडू शकते महागात!

तुमचा फोन किंवा लॅपटॉप चार्ज झाल्यानंतरही तुम्ही स्विच चालूच ठेवता का? यामुळे तुमच्या वीज बिलावर किती परिणाम होतो, ते जाणून घ्या.

काहीही चार्जिंगला लावलेलं नसताना स्विच चालूच ठेवता? ही सवय तुम्हाला पडू शकते महागात!
switch board on light bill
Image Credit source: Pixabay
| Updated on: Nov 19, 2026 | 11:23 AM

आजच्या डिजिटल युगात लहान ते मोठे सगळेच जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वस्तू वापरत आहेत. घरातही जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वस्तू वापरल्या जात आहेत. मोबाईल आणि लॅपटॉप तर अगदी १२-१३ तास सुरूच असतात. त्यामुळे त्याला चार्जिंग करणं आलंच. अनेकदा तर हे डिवाइस असेच चार्जिंगलाच लावून ठेवले जातात. लॅपटॉप किंवा कम्प्युटरचे चार्जिंग तर अनेकदा २४ तास सुरूच असते. पण अनेकदा या डिवाइसचं चार्जिंग काढतात पण विजेचा स्विच चालूच ठेवतात. पण तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, एखादे बटण (स्विच) चालू ठेवल्यास काय होते? यामुळे काही नुकसान होते का? कदाचित तुम्हाला त्याबद्दल कधी सावध केले नसेल. पॉवर आउटलेटचे बटण बंद करायला विसरणे. तुम्हाला जास्त महागात पडू शकते.

जर तुम्ही विचार करत असाल तर असं केल्याने काय फरक पडणार? तर याचं उत्तर आहे याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होतो. याचा परिणाम थेट वीज बिलावर होतो. तुम्हीही ही चूक करत असाल तर तातडीने बंद करा. कारण या सवयीचा वीजबिलाबर नेमका काय आणि कसा परिणाम होतो हे जाणून घ्या.

Loading...

स्विच चालू राहिल्यास वीज बिलावर कसा परिणाम होतो?

एखादे बटण चालू ठेवल्याने तुमच्या वीज बिलावर कितीसा परिणाम होऊ शकेल? असं जरी वाटतं असलं तरी हे लक्षात घ्या की याचा परिणाम नक्कीच वीज बिलावर होतो. जर तुमचा मोबाईल फोन किंवा लॅपटॉप काढून घेतल्यानंतरही चार्जर वॉल सॉकेटमध्येच राहिला आणि त्याचे बटण चालू राहिले, तर कालांतराने या दुर्लक्षामुळे तुमच्या वीज बिलावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. याला ‘फँटम लोड किंवा ‘व्हॅम्पायर ड्रॉ’ असे म्हणतात.

‘फँटम लोड किंवा ‘व्हॅम्पायर ड्रॉ’ म्हणजे काय?

फँटम लोड किंवा ‘व्हॅम्पायर ड्रॉ’ मध्ये एखादे उपकरण बंद असतानाही वीज वापरत राहते. उदाहरणार्थ, जरी तुम्ही तुमचा फोन किंवा लॅपटॉप चार्जरवरून काढून टाकला, तरीही भिंतीवरील स्विच चालू असल्यास तो चार्जर काही प्रमाणात वीज वापरत राहतो. जरी हे थोडस वाटत असलं तरी संपूर्ण महिना किंवा वर्षाच्या कालावधीचा विचार करता याच महिन्याच्या बिलावर परिणाम होतो.

वीज बिलावर किती परिणाम होतो?

उपकरण वापरात नसतानाही ते सॉकेटमधून थोड्या प्रमाणात वीज खेचत राहते. अशा प्रकारे वाया जाणारी वीज एखाद्या घरातील एकूण वीज वापराच्या ५ ते १० टक्क्यांपर्यंत असू शकते. याचाच अर्थ काय तर मोबाईल किंवा इतर कोणतेही उपकरणाचा चार्जेर त्याला वस्तूला जोडला नसला आणि विजेच्या सॉकेटमध्ये असला तरी तो सुमारे ०.१ ते ०.५ वॅट वीज वापरू शकतो. जरी हे प्रमाण कमी वाटत असले, तरी अनेक चार्जर आणि उपकरणे दिवस-रात्र सॉकेटमध्येच लावून ठेवली जातात; परिणामी, महिन्याच्या शेवटी यामुळे तुमच्या वीज बिलात २०० ते ५०० रुपयांची वाढ होऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us