म्हातारपणाचा लूक पाहणं महागात पडेल, Face App मधून डेटा चोरीची भीती

| Updated on: Jul 18, 2019 | 7:45 PM

Face App ने सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनाच या अॅपने वेड लावले आहे. दिवसेंदिवस Face App ची वाढती क्रेझ लक्षात घेता इतर अॅपप्रमाणे या अॅपवरही डेटाची चोरी होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

म्हातारपणाचा लूक पाहणं महागात पडेल, Face App मधून डेटा चोरीची भीती
Follow us on

मुंबई : भारतातील तरुणांमध्ये सध्या Face App ची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनाच या अॅपने चांगलेच वेड लावले आहे. मात्र म्हातारपणाचा लूक बघणे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकते. दिवसेंदिवस Face App ची वाढती क्रेझ लक्षात घेता इतर अॅपप्रमाणे या अॅपवरही डेटाची चोरी होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण हे अॅप वापरण्यासाठी असलेल्या अटी या युझर्सच्या खाजगी माहितींना धोका पोहचवू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे अॅप सुरु केल्यानंतर तुमचे फोटो वापरण्यासाठी परवानगी मागितली जाते. त्यानंतर तुमचे फोटो हे Face App च्या क्लाऊडवर स्टोर केले जातात आणि यानंतर याच माध्यमातून हे फोटो फिल्टर करण्यासाठी अपलोड होतात. विशेष म्हणजे फक्त एक फोटो नाही, तर तुमच्या फोनवर उपलब्ध असणारे अनेक फोटो या अ२पमुळ क्लाऊडवर साठवले जातात.

विशेष म्हणजे Face App वापरण्यासाठी तुमच्याकडे सुरुवातीला फोटो वापरण्याची परवानगी मागितली जाते. तुम्ही ही परवानगी दिल्यानंतर Face App तुमचे फोटो सहजतेने कुठेही वापरु शकतो. विशेष म्हणजे Face App आपल्या फोटोचा वापर हा व्यावसायिक कारणासाठीही केला जाऊ शकतो. यासोबतच Face App कोणत्याही युझर्सचे नाव आणि त्यासोबतची माहिती कोणत्याही मीडिया फॉर्मेटसाठी वापरु शकतो.

म्हणजेच तुम्ही तयार केलेले फोटो हे Face App कंपनी भविष्यात कधीही व्यावसायिक कारणासाठी वापरु शकते. तसेच Face App ने दिलेल्या अटीनुसार, तुम्ही आमच्या ज्या सेवांचा वापर केला आहात, त्या पूर्णपणे सार्वजनिक आहेत आणि त्याचा वापरही सार्वजनिकरित्या होईल असे सांगितले आहे.

विशेष म्हणजे Face App तुमची खासगी माहिती कोणत्याही थर्ड पार्टी कंपनींना शेअर करु शकते. तसेच Face App द्वारे एकत्रित होणारा डेटा हा अमेरिकेतील किंवा इतर देशातील स्टोअर केला जातो असाही दावा केला जात आहे.

संबंधित बातम्या : 

…. म्हणून Face App वर भारतीय युझर्सना अडचण

Face App ने म्हातारा दिसण्यासाठी स्पर्धा, अभिनेत्यांनाही मोह आवरेना