.... म्हणून Face App वर भारतीय युझर्सना अडचण

भारतातील तरुणांमध्ये सध्या Face App ची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र अनेक भारतीय युझर्सना हे Face App वापरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

.... म्हणून Face App वर भारतीय युझर्सना अडचण

मुंबई : भारतातील तरुणांमध्ये सध्या Face App ची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनाच या अॅपने चांगलेच वेड लावले आहे. या अॅपच्या मदतीने सर्वजण स्वत:ला वृद्ध बनवत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हे अॅप डाऊनलोड करुन आपण म्हातारपणी कसे दिसतो हे बघण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अनेक भारतीय युझर्सना हे Face App वापरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे अॅप वापरताना अनेकांना ‘सर्वर उपलब्ध नाहीत, त्यामुळे तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा’ असा मेसेज दिसत आहे. तर काही जणांच्या अॅपमध्ये ओल्ड एज फिल्टर दिसत नसल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या आहेत. दरम्यान या अडचणी का येतात याचा अंदाज काही तज्ज्ञांनी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

Face App ला भारतात अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र भारतातील काही युझर्सना काल 17 जुलैपासून अडचणी येत असल्याची तक्रार केली आहे. काहींनी याबाबतचे स्क्रीनशॉटही शेअर करत यामागचे कारणही विचारले आहे. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे Face App डाऊनलोड केल्यानंतर अनेकांना Something went wrong असा मेसेज दिसत आहे. तर आयफोन वापरणाऱ्यांना सॅड इमोजीसह The operation couldn’t be completed असा मेसेज दिसत असल्याची तक्रार केली आहे.  त्यानंतर काहींनी वीपीएनच्या मदत घेतल्यानंतरच हे अॅप सुरु होत असल्याचे सांगितले आहे.

ERROR येण्यामागचे प्रमुख कारण

विशेष म्हणजे भारतीय युजर्सला हा ERROR दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा ERROR येण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे वर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (वीपीएन) असल्याचे सांगितले जात आहे. वीपीएनद्वारे युझर्सची ओळख लपली जाते. त्यामुळे अनेकजण सहजतेने आयपी अर्ड्रेस बदलतात. त्यामुळे Face App चा वापर नेमका कुठून होत आहे, याची माहिती अॅपला मिळत नसल्याने अनेकदा ERROR चा मेसेज येतो.

अनेकांनी फक्त भारतीयांना हा मेसेज येत असल्याची तक्रार केली. तसेच Face App ने केवळ भारतीयांना ब्लॉक केल्याची चर्चाही रंगू लागल्या आहे . यावर काही युजर्सने Face App गोपनियतेबाबत (Privacy policy) शंका उपस्थित केली आहे.

‘या’ कारणाने भारतीय युझर्स ब्लॉक

दरम्यान Face App अल्पावधीत प्रसिद्ध झाल्याने काल एकाचवेळी अनेकांनी हे अॅप डाऊनलोड केले. कदाचित Face App च्या सर्वरचा परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे Face App वापरताना काही भारतीयांना हे अॅप डाऊनलोड करताना किंवा वापरताना अनेकदा ERROR चा मेसेज येत होता. विशेष म्हणजे याच कारणामुळे Face App ने काही भारतीयांना ब्लॉक केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच हे अॅप इंटरनेटच्या मदतीने काम करते. तरुण चेहरा वृद्ध करण्यासाठी यात एआई फिल्टर वापरावे लागते. मात्र एकाचवेळी अनेक युझर्सने हे अॅप वापरल्यास एआई फिल्टर बंद पडते. या दोन कारणामुळे भारतात या अॅपवर वारंवार ERROR चा मेसेज येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

Face App ने म्हातारा दिसण्यासाठी स्पर्धा, अभिनेत्यांनाही मोह आवरेना

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *