FASTag Scam : ऑनलाइन रिचार्ज महागात, निष्काळजीपणामुळे संपूर्ण खातं रिकामं, नेमकं काय झालं? जाणून घ्या आणि सतर्क व्हा…

| Updated on: Aug 22, 2022 | 6:05 AM

FASTag Scam : मुंबईतील एका महिलेला FASTag रिचार्ज ऑनलाइन करून घेणं महागात पडलंय. ऑनलाइन रिचार्ज करताना महिलेची फसवणूक झाली. काही मिनिटांतच तिच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाले. वाचा...

FASTag Scam : ऑनलाइन रिचार्ज महागात, निष्काळजीपणामुळे संपूर्ण खातं रिकामं, नेमकं काय झालं? जाणून घ्या आणि सतर्क व्हा...
ऑनलाइन रिचार्ज महागात
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : ऑनलाइन रिचार्ज हा आपल्या दैनंदिन कामाचा भाग बनला आहे. आपण वीज बिल, टीव्ही आणि मोबाइल रिचार्जपासून तिकीट बुकिंगपर्यंत ऑनलाइन पेमेंट करतो. डिजिटल इंडिया मोहिमेनंतर आता टोल यंत्रणाही ऑनलाइन म्हणजेच फास्टॅगशी (FASTag) जोडली गेली आहे. चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग रिचार्ज आवश्यक झाले आहे. FASTag ऑनलाइनही रिचार्ज करता येतो. पण, मुंबईतील एका महिलेला FASTag रिचार्ज ऑनलाइन करून घेणे चांगलंच महागात पडलं आहे. ऑनलाइन रिचार्ज करताना महिला फसवणुकीची (FASTag Scam) बळी ठरली. त्यानंतर काही मिनिटांतच तिच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाले. या फसवणुकीची तक्रार पीडितेनं मुंबईतील पोलीस ठाण्यात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा ऑनलाइन फ्रॉडचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान, मुंबईतल्या (Mumbai) या प्रकरणामुळे पुन्हा एकदा खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जातंय.

नेमकं काय प्रकरण?

ऑनलाइन रिचार्ज करताना ज्या महिलेची फसवणूक झाली ती महिला मुंबईतील आहे. ऑनलाईन व्यवहार करताना महिला फसवणुकीची (FASTag Scam) बळी ठरली आहे. त्यानंतर काही मिनिटांतच तिच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाले. या प्रकरणी फसवणुकीची तक्रार पीडितेने मुंबईतील एका पोलीस ठाण्यात केली आहे. एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मुंबईतील (Mumbai) एका महिलेने FASTag ऑनलाइन कसे रिचार्ज करायचे याविषयी माहितीसाठी इंटरनेटवर शोधत होती. त्यानंतर तिला कस्टमर केअर नंबर सापडला. महिलेनं त्या नंबरवर कॉल करून ऑनलाइन FASTag रिचार्जसाठी मदत मागितली असता तिला एक लिंक पाठवण्यात आली.

लिंकवर क्लिक केलं अन्…

ऑनलाइन FASTag रिचार्जसाठी  महिलेला एक लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर महिलेच्या फोनमध्ये एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले. त्यानंतर तिला बनावट कस्टमर केअर एजंटनं लॉग इन करण्यास सांगितले. लॉग इन केल्यानंतर त्याला फास्टॅग रिचार्ज यशस्वी झाल्याचा संदेश आला. महिलेनं नंतर तिचे बँक तपशील तपासले असता तिच्या खात्यातून अनेक व्यवहारांमधून सुमारे 7 लाख रुपये गायब झाले होते. यानंतर महिलेने मुंबई पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दिली. सुदैवानं महिलेनं तात्काळ बँकेला फसवणुकीची माहिती दिली. त्यामुळे बँकेने अडीच लाखांचे व्यवहार थांबवले.

हे सुद्धा वाचा

सावध रहा!

असा कोणताही प्रकार तुमच्यासोबतही होऊ शकतो. त्यामुळे सावध रहा आणि अशा प्रकारची कोणतीही माहिती कुणाला देऊ नका. तुमची छोटी चुक तुम्हाला खूप महागात पडू शकते. कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यायला हवी.