आयफोन 16 प्रो मॅक्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पहिल्यांदा मिळतेय बंपर सुट, कशी ते पहा

Flipkart Big Billion Days Sale मध्ये iPhone 16 Pro Max पहिल्यांदा घसघशीत डिस्काऊंट मिळणार आहे. ही ऑफर लिमिटेड काळासाठीच असू शकते. त्यामुळे या फोनच्या किंमतीत पुन्हा वाढ देखील होऊ शकते. ही ऑफर त्या लोकांसाठी सुवर्णसंधी आहे ज्यांना Appleचे फ्लॅगशिप मॉडेल स्वस्तात विकत घ्यायचे आहे.

आयफोन 16 प्रो मॅक्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पहिल्यांदा मिळतेय बंपर सुट, कशी ते पहा
iPhone 16 Pro Max
| Updated on: Sep 09, 2025 | 10:19 AM

Flipkart Big Billion Days Sale लवकरच सुरु होत आहे. जर तुम्हालाही iPhone 16 Pro Max खरेदी करण्यासाठी सेलची वाट पाहात असाल तर पहिल्यांदा Apple चा हा फ्लॅगशिप फोन एक लाख रुपयांहूनही कमी किंमतीत मिळणार आहे. असे म्हटले जात आहे की हा सेल मर्यादित काळासाठी असणार आहे. नंतर या सेलमध्ये या फोनची किंमत पुन्हा वाढू शकते. त्यामुळे सेल सुरु होताच जर तुम्हाला डील दिसली तर या संधीचा लागलीच फायदा घ्या, कारण वारंवार अशी संधी मिळणार नाही…

iPhone 16 Pro Max 256GB Price

Flipkart Sale Date उघड झाल्यानंतर हळूहळू या फोन सोबत मिळणाऱ्या शानदार ऑफरवरुनही पडदा हटला आहे. आता फ्लिपकार्टने अलिकडे एक नवीन फोटो शेअर केला आहे त्यात iPhone 16 Pro Max बाबत किंमत जरी उघड केली नसली तरी या बाबत संकेत मिळाला आहे की या फोनची किंमत एक लाखाहून कमी असू शकते. आयफोन 16 प्रो मॅक्सला 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटला गेल्यावर्षी 1 लाख 44 हजार 900 रुपयांना लाँच केले होते.

जे गेल्या वर्षी लाँच झालेल्या Apple च्या या फ्लॅगशिफ मॉडेल खरेदी करु इच्छीत होते त्या लोकांसाठी देखील यंदा मोठी संधी आहे. दर वर्षांसारखा यावर्षी देखील नवीन आयफोन 17 सिरीज लाँच झाल्यानंतर कंपनी काही जुन्या प्रो मॉडेल्सना डिस्कंटीन्यू करु शकते. फोनवर सुट मिळण्यासोबतच तुम्ही बँक कार्ड, जुना फोन दिल्यानंतर एक्स्चेंज ऑफरचा देखील फायदा उठवून एक्स्ट्रा सेव्हींग करु शकता.

iPhone 16 Pro Max Specifications

या आयफोन 16 प्रो फ्लॅगशिप मॉडेलमध्ये 6.9 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिलेला आहे. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्कींगसाठी ए 18 प्रो चिपसेट, 48 मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सेंसर दिलेला आहे.

येथे पाहा फिल्पकार्टची जाहिरात –

Flipkart Sale Offers

फ्लिपकार्ट सेलमध्ये मोटोरोला एज 60 प्रो, आईफोन 16 आणि सॅमसंग गॅलेक्सी एस 24 सारखे फ्लॅगशिप फिचर्स वाले फोन देखील तुम्हाला कमी किंमतीत मिळणार आहे.केवळ स्मार्टफोनच नव्हे तर ईअरबड्स, स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशिनसह हजारो प्रोडक्ट्सना स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे.