फ्रान्सने गुगल आणि फेसबुकवर लावला कोट्यवधींचा दंड, जाणून घ्या त्यामागचे कारण

| Updated on: Jan 07, 2022 | 6:23 PM

फ्रान्समध्ये कुकी ट्रॅकिंगसाठी Google आणि Facebook यांना संयुक्तपणे 235 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

फ्रान्सने गुगल आणि फेसबुकवर लावला कोट्यवधींचा दंड, जाणून घ्या त्यामागचे कारण
फाईल फोटो
Image Credit source: google
Follow us on

मुंबई : फ्रान्समध्ये कुकी ट्रॅकिंगसाठी Google आणि Facebook यांना संयुक्तपणे 235 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. एका दस्तऐवजाचा हवाला देत Politico मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, फ्रेंच मॉनिटरिंग Commission nationale de l’informatique et des libertés (CNIL) ने फ्रेंच डेटा गोपनीयता नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल Google ला 150 मिलियन युरो आणि फेसबुकला 60 मिलियन युरोंचा दंड ठोठावला आहे. अहवालात असे म्हटले आहे की “फ्रेंच युजर्सना कुकी ट्रॅकिंग तंत्रज्ञानास सहजपणे परवानगी देण्यास अयशस्वी झाल्याबद्दल” ही कारवाई केली जात आहे. (France fines Google and Facebook 235 million dollars over user tracking)

सीएनआयएलने निर्णय जारी केल्यापासून तीन महिन्यांच्या आत समस्यांचे निराकरण न केल्याबद्दल या दोन टेक दिग्गजा कंपन्यांना दररोज 100,000 युरोचा दंड ठोठावला जाईल. मात्र, फेसबुकने हे मान्य करण्यास नकार दिला आहे. “आम्ही प्राधिकरणाच्या निर्णयाचे पुनरावलोकन करत आहोत आणि संबंधित प्राधिकरणांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहोत,” असे मेटाच्या प्रवक्त्याने अहवालात म्हटले आहे. “आमची कुकी संमती नियंत्रणे लोकांना त्यांच्या डेटावर अधिक नियंत्रण देतात, ज्यात Facebook आणि Instagram वरील नवीन सेटिंग्ज मेनू समाविष्ट आहे, जेथे युजर्स कधीही पुन्हा भेट देऊ शकतात आणि त्यांचे निर्णय व्यवस्थापित करू शकतात,” प्रवक्त्याने सांगितले. आम्ही ही नियंत्रणे विकसित आणि सुधारणे सुरू ठेवत आहोत.”

Google आणि Amazon वरही कारवाईचा बडगा

गुगलने या अहवालावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. फ्रेंच प्रायव्हसी रेग्युलेटरने या टेक जायंट कंपनीला दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ नाही. डिसेंबर 2020 मध्ये, CNIL ने अॅमेझॉन आणि Google ला 35 मिलियन युरो आणि प्रत्येकी100 मिलियन युरोंचा दंड ठोठावला होता. ई-गोपनीयतेच्या नियमांनुसार कुकीच्या उल्लंघनामुळे हा दंड ठोठावण्यात आला होता. वॉचडॉगने गुगलला जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (GDPR) अंतर्गत 50 मिलियन युरोचा दंडही ठोठावला आहे.

याआधी WhatsApp वर कारवाई

ZDNet च्या अहवालानुसार, WhatsApp ला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 225 मिलियन युरोचा दंड ठोठावण्यात आला होता “त्यांनी त्यांची मूळ कंपनी (पॅरेंट कंपनी) सोबत डेटा कसा काय शेअर केला? तसेच याबाबत पारदर्शकता नसल्याबद्दल” ही कारवाई करण्यात आली होती. डिसेप्टिव डेटा संकलन धोरणाबाबत (डेटा कलेक्शन पॉलिसी) GDPR गोपनीयता नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल फेसबुकला लाखो रुपयांच्या दंडालाही सामोरे जावे लागत आहे.

इतर बातम्या

नवीन वर्षात व्हाट्सअपचे नवीन फिचर ! नोटिफिकेशनमध्ये दिसणार चेहरा, नोटिफिकेशनमध्ये युजरचा चेहरा स्क्रीनवर झळकणार

Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…

Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर…

(France fines Google and Facebook 235 million dollars over user tracking)