AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर…

HMD Globalनं कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) 2022मध्ये चार नवीन Nokia फोन लाँच केले आहेत. Nokia C100, Nokia C200, Nokia G100 आणि Nokia G400 हे ते चार फोन आहेत. हे फोन अमेरिकेबाहेर उपलब्ध होतील, की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर...
नोकिया मोबाइल
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 3:24 PM
Share

मुंबई : HMD Globalनं कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) 2022मध्ये चार नवीन Nokia फोन लाँच केले आहेत. नवीन नोकिया फोन कंपनीच्या बजेट लाइनअपचा एक भाग म्हणून आले आहेत आणि त्यांची किंमत $250 किंवा अंदाजे 18,600 रुपये आहे.

एचएमडी ग्लोबल(HMD Global)चे दोन नवीन फोन नवीन नोकिया सी-सिरीजचे आहेत, तर इतर दोन नोकिया जी-सिरीजचा भाग आहेत. Nokia C100, Nokia C200, Nokia G100 आणि Nokia G400 हे ते चार फोन आहेत. हे फोन अमेरिकेबाहेर उपलब्ध होतील, की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र या नव्या प्रॉडक्ट्सची फिचर्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पाहू या…

Nokia C100, Nokia C200 Nokia C100 आणि Nokia C200 दोन्ही MediaTek Helio A22 चिपसेटवर चालतात. नोकिया सी सिरीजच्या दोन स्मार्टफोनपैकी Nokia C200मध्ये 6.1 इंचाचा मोठा डिस्प्ले आहे. फोनचे बाकीचे फिचर्स जवळपास सारखेच आहेत, जे त्यांच्या किंमती टॅगवरून समजू शकतात. Nokia C100 आणि C200 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज स्पेससह येतात. हे फोन आउट ऑफ द बॉक्स Android 12वर चालतात आणि 4000mAh बॅटरी सपोर्टसह येतात. फोनच्या मागील बाजूस सिंगल-लेन्स कॅमेरा सेटअप आहे. Nokia C100 ची किंमत $99 किंवा अंदाजे 7,400 रुपये आहे, तर Nokia C200ची किरकोळ किंमत $119 किंवा अंदाजे 9,000 रुपये असेल.

Nokia G100 नोकियाच्या जी-सिरीज फोन्ससाठी, Nokia G100 प्रथम येतो, ज्यामध्ये HD+ रिझोल्यूशनसह 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे. याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 चिपसेट देण्यात आलाय. यात ट्रिपल-लेन्स कॅमेरा सेटअप आहे. फोनला सपोर्ट करण्यासाठी 5,000 mAhची बॅटरी देण्यात आलीय. अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये फोनच्या पॉवर बटणामध्ये फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश आहे.

Nokia G400 Nokia G400मध्ये सेल्फी कॅमेर्‍यासाठी वॉटरड्रॉप नॉचसह 120Hz डिस्प्ले असेल, तरीही डिस्प्लेचा आकार अद्याप उघड झालेला नाही. डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसरयुक्त आहे, 6GB RAM आणि 128GB इन्टर्नल स्टोरेजसह जोडलेला आहे. हा एक 5G फोन आहे, याचा अर्थ हा सध्या HMD ग्लोबलचा सर्वात परवडणारा 5G स्मार्टफोन म्हणून समोर येतोय.

मागील बाजूस, Nokia G400मध्ये ट्रिपल-लेन्स कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 48-मेगापिक्सेल मुख्य लेन्स, एक अल्ट्रावाइड लेन्स आणि मॅक्रो सेन्सर आहे. Nokia G100ची किंमत $149 किंवा अंदाजे 11,000 रुपये आहे, तर Nokia G400ची किंमत $239 किंवा अंदाजे 18,000 रुपये आहे.

120Hz डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा सेटअपसह Samsung चा नवीन फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung चे Galaxy A33 5G आणि Galaxy A13 5G लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?

OnePlus 10 Pro पुढच्या आठवड्यात बाजारात, लाँचिंगआधीच कॅमेरा डिटेल्स, स्पेसिफिकेशन्स लीक

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.