परवडणाऱ्या इअरबड्सपासून ते नवीन स्मार्टवॉचपर्यंत, AI+ ने लाँच केले हे नवीन डिव्हाइस

AI+ ने भारतात इयरबड्स आणि स्मार्टवॉचसह एक नवीन लाइनअप लाँच केला आहे. जे परवडणारे ते मध्यम रेंजचे डिव्हाइस आहेत चला तर मग कोणते डिव्हाइस लाँच केले आहेत ते जाणून घेऊयात.

परवडणाऱ्या इअरबड्सपासून ते नवीन स्मार्टवॉचपर्यंत, AI+ ने लाँच केले हे नवीन डिव्हाइस
Ai+ new launch
| Edited By: | Updated on: Feb 25, 2026 | 3:09 PM

Ai+ ने भारतात NovaPods Pro, NovaPods Go, NovaWatch Active, NovaPods Clips, NovaWatch Kids 4G आणि Ai+ Wearbuds असे डिव्हाइस लाँच केले आहेत. नवीन AIoT लाइनअपमध्ये परवडणाऱ्या ते मध्यम रेंजच्या श्रेणीतील वायरलेस इयरबड्स आणि स्मार्टवॉच समाविष्ट आहेत. सर्व NovaPods मॉडेल्समध्ये 10mm ड्रायव्हर्स आणि IPX4-रेटेड संरक्षण आहे, तर काही डिव्हाइस हे ब्लूटूथ 6.0 आणि लो-लेटन्सी मोडला सपोर्ट करतात. चला तर मग या सर्व डिव्हाइसची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

NovaPods Go आणि NovaWatch किंमत

गो व्हेरिएंटची किंमत 699 रूपये आहे तर प्रो व्हेरिएंटची किंमत 1,999 रूपये आणि नोव्हापॉड्स क्लिप्सची किंमत 3 हजार 999 रूपये आहे.

एआयच्या या स्मार्टवॉच लाइनअपमध्ये नोव्हावॉच ॲक्टिव्हची किंमत 2 हजार 499 रूपये आणि नोव्हावॉच किड्स 4जीची किंमत 2 हजार 999 रूपये आहे. स्मार्टवॉचसह डिटॅचेबल येणारे इयरबड्स असलेले Ai+ Wearbuds ची किंमत 7 हजार 999 रूपये आहे. ही सर्व उपकरणे फ्लिपकार्टवर 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होतील.

नोव्हापॉड्स गो, नोव्हापॉड्स क्लिप्स आणि नोव्हापॉड्स प्रो ची वैशिष्ट्ये

गो, प्रो आणि क्लिप व्हेरिएंटमध्ये 10 मिमी ड्रायव्हर्स आहेत आणि स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी ते सर्व IPX4 रेट केलेले आहेत. गो आणि क्लिप व्हेरिएंटमध्ये ड्युअल मायक्रोफोन आहेत, तर प्रो व्हेरिएंटमध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसह सहा-मायक्रोफोन सेटअप आहे. प्रो आणि क्लिप व्हेरिएंटसाठी कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 6.0 समाविष्ट आहे, तर गो व्हेरिएंट ब्लूटूथ 5.4 ला सपोर्ट करतो.

गो व्हेरिएंट 60 मिलीसेकंद कमी लेटन्सीला सपोर्ट करतो, तर प्रो व्हेरिएंट 45 मिलीसेकंद कमी लेटन्सीला सपोर्ट करतो. क्लिप्स व्हेरिएंट 50 मिलीसेकंद कमी लेटन्सीला सपोर्ट करतो. गो आणि क्लिप्स दोन्ही व्हेरिएंटमध्ये टच कंट्रोल्स आहेत, तर प्रो आणि क्लिप्समध्ये हॉल स्विच तंत्रज्ञान आहे.

बॅटरी लाइफच्या बाबतीत बोलायचे झाले तर गो व्हेरिएंट 6.5 तासांपर्यंत आणि एकूण 24 तासांपर्यंत प्लेबॅक देतात. प्रो व्हेरिएंट 5 तासांपर्यंत आणि एकूण 30 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतात. नोव्हापॉड्स क्लिप्सबद्दल, हे व्हेरिएंट 6 तासांपर्यंत आणि एकूण 16 तासांपर्यंत प्लेबॅकचा दावा करतात. नोव्हावॉच अॅक्टिव्हमध्ये 1.73-इंचाचा AMOLED डिस्प्ले, डायल पॅड आणि ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट आहे.