AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EV Charging : EV चार्जिंगचा गेमच बदलणार! Geelyची कार फक्त ४ मिनिटांत ७०% चार्ज होणार

Geelyने AI आधारित Smart Charging टेक्नोलॉजी सादर केली असून कंपनीच्या चाचणीत EV बॅटरी १०% वरून ७०% पर्यंत ४ मिनिटांत चार्ज झाली.

EV Charging : EV चार्जिंगचा गेमच बदलणार! Geelyची कार फक्त ४ मिनिटांत ७०% चार्ज होणार
ev vehicleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 27, 2026 | 4:30 PM
Share

इलेक्ट्रिक कार चार्जिंगला लावली की आपण आधी गाडीपेक्षा चार्जिंग मीटरकडेच जास्त लक्ष देतो. २० टक्के , ३० टक्के, ४० टक्के आणि तोपर्यंत आपला अर्धा पेशन्स संपलेला असतो, पण आता EV मालकांची हीच वाट पाहण्याची कटकट कमी होण्याची शक्यता आहे. कारण चीन कंपनी Geely ने अशी चार्जिंगची टेक्नोलॉजी आणली आहे. ज्यामुळे ७० टक्क्यापर्यंत चार्जिंग थेट ४ मिनिटांत होणार आहे.

चार्जिंगंमध्ये AI ची मदत

Geely च्या नव्या smart Chargimg तंत्रज्ञानाची चाचणी lynk & Co 10 आणि Zeeker 001 या गाड्यांमध्ये करण्यात आली. कंपनीच्या म्हणण्यांनुसार, या चाचणीत बॅटरी १० टक्क्यांवरून ७० टक्क्यापर्यंत अवघ्या ४ मिनिटे ३० सेकंदात चार्ज झाली. या टेक्नोलॉजीमध्ये AI चा वापर करण्यात आला. Xingrui PowerMind नावाचं AI मॉडेल गाडी, बॅटरी, चार्जिंग स्टेशन,वीज यत्रणा आणि इतर घटकांमधील माहितीचा वापर करून चार्जिंग प्रक्रिया नियंत्रित करतं. त्यामुळे फास्ट चार्जिंग व्हायला मदत होणार आहे.

बॅटरी जास्त गरम होऊ नये याचीही काळजी

एवढ्या वेगाने चार्जिंग करताना बॅटरी गरम होण्याचा धोक असतो. त्यामुळे Geely ने चार्जिंगच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी पाच टप्प्यांचं लिक्क्विड कुलिंग सिस्टम देखील वापरलं आहे. चार्जिंग स्टेशनमधील ऊर्जा साठवणूक यंत्रणा, चार्जिंग युनिट, केबल चार्जिंग पोर्ट आणि कारची बॅटरी अशा संपूर्ण साखळीतील उष्णता नियंत्रित करण्याचा प्रयत्न या सिस्टममधून केला जाणार आहे.

बॅटरीच्या आयुष्यावरही लक्ष

फास्ट चार्जिंगलमुळे बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो का हा प्रश्न EV वापरकर्त्यांनी पडला आहे. यासाठी Geely ने lithiumion Pulse Restoration Technology दिली आहे. कंपनीच्या मते मायक्रो – पल्स करंटच्या मदतीने बॅटरीमध्ये होणाऱ्या काही प्रकारच्या झाजेला कमी करण्यात येणार आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल