Gmail Tips : असे ठेवा हॅकर्सपासून तुमचे गुगल अकाउंट सुरक्षित, जाणून घ्या ‘हे’ दोन प्रभावी मार्ग

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासह, जीमेल अकाउंटची सुरक्षा महत्त्वाची आहे. तुमचे जीमेल अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमच्या अकाउंटचे हॅकिंगपासून संरक्षण करू शकता.

Gmail Tips : असे ठेवा हॅकर्सपासून तुमचे गुगल अकाउंट सुरक्षित, जाणून घ्या हे दोन प्रभावी मार्ग
| Edited By: | Updated on: Jul 24, 2025 | 2:30 PM

आजच्या काळात तंत्रज्ञान जितक्या वेगाने प्रगती करत आहे तितकेच त्याच्या गैरवापराचे धोकेही जास्त वाढत चालेले आहेत. स्मार्टफोनशिवाय आपण एकही दिवस राहू शकत नाहीत, तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आता आपला स्मार्टफोन केवळ फोन नंबर किंवा फोटो सेव्ह करत नाही. उलट, त्यात बँकिंग डिटेल्ससह आपली सर्व प्रकारची माहिती असते. यासोबतच, ईमेल किंवा जीमेल खात्याशिवाय स्मार्टफोन चालवणे आता जवळजवळ अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत आपल्या जीमेल खात्याला आपल्या फोनमध्ये असलेल्या सर्व डेटाची माहिती असते. त्यामुळे जीमेलची सुरक्षितता खूप महत्वाची आहे.

गुगलने एका अहवालात म्हटले आहे की दरवर्षी सुमारे १५ टक्के इंटरनेट वापरकर्त्यांचे अकाउंट हॅक होतात. अशा परिस्थितीत जीमेल अकाउंटची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आज आम्ही तुमच्यासोबत काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे जीमेल अकाउंट सुरक्षित ठेवू शकता.

जीमेल अकाउंट कसे सुरक्षित करावे?

1. 2-SV चालू करा

तुमचे Google अंकाउटला पासवर्डच्या भरोश्यावर ठेवणे धोकादायक असू शकते. तर अकांउटचे २-स्टेप व्हेरिफिकेशनच्या मदतीने जीमेलला अतिरिक्त सुरक्षितता देते.

यामुळे फिशिंग हल्ल्यांचा धोका देखील कमी होतो.

असे करा इनेबल

स्टेप 1 – गुगल अकाउंटच्या सेक्युरिटी सेटिंग्जमध्ये जा.

स्टेप 2 – ‘साइन इन टू गुगल’ वर जा आणि २-स्टेप व्हेरिफिकेशन वर क्लिक करा.

स्टेप 3 – यामध्ये तुम्हाला टेक्स्ट, ऑथेंटिकेटर अॅप किंवा सिक्युरिटी की चा पर्याय मिळेल.

स्टेप 4 – यानंतर बॅकअप फोन नंबर आणि रिकव्हरी ईमेल व्हेरिफाय करा.

गुगल पासवर्डऐवजी पास की वापरा

ही एक प्रकारची पासवर्डलेस लॉगिन अॅडव्हांस सिस्टीम आहे. पास की तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंट, फेस रेकग्निशन किंवा डिव्हाइस पिन द्वारे लॉग इन करण्याची परवानगी देते.

पास-की कशी तयार करावी

स्टेप 1 – सेटिंग्जमध्ये जाऊन ‘हाव यू साइन इनटु गुगल’ पासकी निवडा.

स्टेप 2 – पासकी तयार करण्यासाठी क्लिक करा. ऑनस्क्रीन प्रॉम्प्टद्वारे असे करण्यासाठी डिव्हाइसच्या बायोमेट्रिक ऑथेटिकेशनचा वापर करा.