टोलचे पैसे वाचविण्याचा जुगाड; Google मदतीला धावणार, ही सेटिंग करुन तर पाहा

| Updated on: Mar 28, 2024 | 2:20 PM

Google Maps मधील एक सीक्रेट फीचर तुमच्या अत्यंत उपयोगी येऊ शकते. तुमचे टोलचे पैसे वाचू शकतात. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी हमरस्ता वापरण्यात येतो. म्हणजे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्गाचा वापर अनेक जण करतात. पण त्यासाठी टोल द्यावा लागतो. या फीचरच्या मदतीने तुमचा टोल वाचू शकतो.

टोलचे पैसे वाचविण्याचा जुगाड; Google मदतीला धावणार, ही सेटिंग करुन तर पाहा
असे वाचतील पैसे
Follow us on

देशात रस्त्यांचे मजबूत जाळे विणण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग, समृद्धी, ग्रीन वे यामुळे दळणवळणाला गती आली आहे. झटपट एका शहरातून दुसरे शहर गाठता येणे शक्य झाले आहे. वेळ आणि इंधनाची मोठी बचत होत आहे. पण त्यासाठी नागरिकांना खिसा खाली करावा लागतो. त्यांना टोल टॅक्स भरावा लागतो. दूरच्या प्रवासात तर टोल टॅक्समुळेच मोठा भूर्दंड सहन करावा लागतो. अशावेळी Google Maps मधील एक सीक्रेट फीचर तुमच्या मदतीला येऊ शकते. त्याचा खुबीने वापर तुमची आर्थिक बचत करु शकते.

Google Maps Tips : असा करा वापर या सीक्रेट फीचरचा

  1. सर्वात अगोदर स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्स उघडा. गुगल मॅप्स उघडल्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या डायरेक्शनच्या आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही डायरेक्शनच्या आयकॉनवर क्लिक करताच तुम्हाला स्टार्ट लोकेशन आणि डेस्टिनेशन ( ज्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे, त्याचे नाव नमूद करावे लागेल.)
  2. सुरुवातीचे स्थळ आणि पोहचण्याचे, गंतव्य स्थान टाकल्यानंतर, तुम्ही कोणत्या वाहनाचा म्हणजे कार, बाईक यापैकी कशाचा वापर करणार याची निवड करावी लागेल. त्याआधारे गुगल तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी किती कालावधी लागेल, याची माहिती देईल.
  3. हे सुद्धा वाचा
  4. आता तुमच्या मार्गात किती टोल नाके आहेत, याची माहिती लागलीच संबंधित मार्गिकेवर येईल. पण तुम्हाला जर टोल वाचवायचा असेल तर त्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूवर क्लिक करावे लागेल.

गुगलचे पैसे वाचविणारे फीचर

तुम्ही गुगल मॅप्सचा थ्री डॉटवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील. यामधील पहिल्या Options या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला Avoid Tolls हा पर्याय समोर दिसेल. तुम्ही जेव्हा या सीक्रेट फीचरला ऑन कराल. गुगल मॅप्स तुम्हाला असा रस्ता दाखवेल, जिथे तुम्हाला टोल नाका लागणार नाही आणि तुमच्या पैशांची बचत होईल.

ही गोष्ट ठेवा लक्षात

टोल नाका वाचविण्यासाठी, तुमचे दुरचे इच्छित स्थळ गाठण्यासाठी तुम्हाला सहाजिकच अधिकचा प्रवास करावा लागू शकतो. कारण टोल नाका असलेल्या एक्सप्रेस वे, हायवे तुम्हाला झटपट तुमच्या इच्छितस्थळी पोहचवू शकतील. तर विना टोल नाके असलेल्या रस्त्यांवरील प्रवास अधिक जिकरीचा, दूरचा ठरु शकतो. त्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.