Maruti Suzuki ने रचला इतिहास; मार्केट कॅपने ओलांडला 4 लाख कोटींचा टप्पा

मारुती सुझुकी इंडियाच्या शेअरने बुधवारी कमाल केली. या शेअरने 52 आठवड्यातील उच्चांक गाठला. या घौडदौडीमुळे कंपनीने मोठा पल्ला गाठला. कंपनीचे मार्केट कॅप 4 लाख कोटींच्या घरात पोहचले. असा करिष्मा करणारी मारुती सुझुकी ही देशातील 19 वी सूचीबद्ध कंपनी ठरली आहे.

Maruti Suzuki ने रचला इतिहास; मार्केट कॅपने ओलांडला 4 लाख कोटींचा टप्पा
मारुती सुझुकीने केले मालामाल
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 11:10 AM

देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने अजून एक रेकॉर्ड नावे केला आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने (Maruti Suzuki India) 27 मार्च रोजी 4 लाख कोटी भांडवलाचा माईलस्टोन गाठला. असा करिष्मा करणारी ही देशातील 19 वी सूचीबद्ध कंपनी झाली. यावर्षात मारुती सुझुकीचा शेअर 23 टक्क्यांसह उसळला. आता कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि एसबीआय सारख्या दिग्गज कंपन्यांच्या क्लबमध्ये सहभागी झाली आहे.

52 आठवड्यांचा गाठला उच्चांकी स्तर

मारुती सुझुकीने नुकताच एक कमाल रेकॉर्ड नावे केला होता. मारुती सुझुकीची मूळ कंपनी जपानची सुझुकी मोटर कॉर्पपेक्षा तिचे बाजारातील मूल्य दुप्पट झाले होते. बुधवारी व्यापारी सत्रा दरम्यान दुपारी 12.30 वाजता बीएसईवर कंपनीच्या स्टॉकने 52 आठवड्यातील उच्चांकी स्तर 12,724,95 रुपयांचा आकडा गाठला. एका दिवसापूर्वीच हा शेअर तेजीत होता. संध्याकाळी शेअर बंद होईपर्यंत तो 2.40 टक्क्यांच्या उसळीसह 12,550 रुपयांवर पोहचला. कंपनीने 4 लाख कोटी रुपयांचे मार्केट व्हॅल्यू मिळवले.

हे सुद्धा वाचा

कंपनी दिग्गज क्लबमध्ये

या कामगिरीमुळे कंपनी रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एसबीआय, एलआयसी, एचयुएल, आयटीसी, एलअंडटी, बजाज फायनान्स, अदानी एनर्जी, अदानी ग्रीन, एचसीएल टेक, अदानी इंटरप्रायजेस, कोटक महिंद्रा आणि अदानी टोटल गॅसच्या रांगेत जाऊन बसली.

जपानी चलन घसरणीचा फायदा

बुधवारी जपानचे चलन येन त्याच्या 34 वर्षातील निच्चांकी स्तरावर पोहचले. या तिमाहीत डॉलरच्या तुलनेत येन 7 टक्क्यांपर्यंत खाली आले. येन घसरणीचा फायदा मारुती सुझुकीला झाला. या कंपनीला जपानमधून सामान आणि सेवांसाठी आता कमी पैसा खर्च करावा लागत आहे. त्यांची लाखो रुपयांची बचत झाली आहे. देशात मारुती सुझुकीच्या वाहनांचा धडाका सुरु आहे. महसूलासह नफ्यातही वाढ झाली आहे. परिणामी कंपनीचा शेअर पण चांगली कामगिरी बजावत आहे.

अनेक हायब्रिड वाहनं रांगेत

तज्ज्ञानुसार, नवीन ब्रिझा, ग्रँड विटारा आणि फ्रॉन्क्सने कंपनीच्या विक्रीत मोठी भर घातली आहे. छोट्या कार सेगमेंटमध्ये कंपनीने अगोदरच पकड मिळवली आहे. आता कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये पण कंपनी चांगली कामगिरी करत आहे. येत्या तीन वर्षांत कंपनी मजबूत हायब्रिड कार आणणार आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.