Amazon Great Freedom Sale 2026 : Amazon ने उघडले पत्ते, Great Freedom Sale 7 ऑगस्टपासून सुरू, मिळणार बंपर ऑफर्स

अमेझॉनच्या Great Freedom Sale 2026 ची सुरुवात 7 ऑगस्ट रोजी होत असून अनेक गोष्टींवर मोठमोठ्या ऑफर्स आहेत. जर तुम्ही येत्या काही दिवसांत नवीन गॅझेट किंवा होम अप्लायन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे नक्की वाचा

Amazon Great Freedom Sale 2026 : Amazon ने उघडले पत्ते, Great Freedom Sale 7 ऑगस्टपासून सुरू, मिळणार बंपर ऑफर्स
लवकरच सुरू होणार अमेझॉनचा सेल
| Updated on: Aug 03, 2026 | 3:07 PM

नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही किंवा होम अप्लायन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आणखी काही दिवसांची प्रतीक्षा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. Amazon ने आपल्या Great Freedom Sale 2026 ची अधिकृत घोषणा केली असून, हा मेगा सेल 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सपासून ते होम अप्लायन्सेसपर्यंत अनेक उत्पादनांवर आकर्षक सवलती मिळणार आहेत. याशिवाय बँक ऑफर्स, कॅशबॅक आणि एक्सचेंज डील्समुळे ग्राहकांना अधिक बचत करण्याची संधी मिळेल.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही Amazon ची Great Freedom Sale आणि Flipkart ची Freedom Sale यांच्यात जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

Amazon Great Freedom Sale कधी सुरू होणार?

Amazon ने जाहीर केल्याप्रमाणे, Great Freedom Sale 2026 ची सुरुवात 7 ऑगस्ट रोजी होईल. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ही सेल आयोजित केली जाते. गेल्या वर्षी सेल 31 जुलैपासून सुरू झाला होता, तर यंदा तो 7 ऑगस्टपासून ग्राहकांसाठी सुरू होणार आहे. तर फ्लिपकार्टचा सेल 8 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे दोघांमध्येही काटे की टक्कर पहायला मिळू शकते.

कोणत्या उत्पादनांवर मिळतील ऑफर्स?

या सेलमध्ये विविध श्रेणीतील उत्पादनांवर मोठ्या सवलती मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये पुढील उत्पादनांचा समावेश आहे:

स्मार्टफोन

लॅपटॉप

स्मार्ट टीव्ही

टॅबलेट

TWS इयरबड्स

वॉशिंग मशीन

रेफ्रिजरेटर

एअर कंडिशनर

मायक्रोवेव्ह

इतर होम अप्लायन्सेस

बँक ऑफर्स आणि कॅशबॅक

सेलदरम्यान HDFC Bank क्रेडिट कार्ड आणि Easy EMI द्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच Amazon Pay ICICI Bank Credit Card वापरून पेमेंट केल्यास 5% पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

ग्राहकांसाठी खास डील्स

Amazon ने आपल्या मायक्रोसाइटवर अनेक आकर्षक ऑफर्सची माहिती दिली आहे. त्यामध्ये Blockbuster Deals, Trending Deals, रात्री 8 वाजताच्या Special Deals, Exchange Offers, Top 100 Deals आणि Price Crash Store यांचा समावेश आहे. याशिवाय निवडक उत्पादनांवर Amazon Coupons, Combo Deals आणि मोफत गिफ्ट्सचाही लाभ मिळू शकतो.

2,000 पर्यंत कॅशबॅकची संधी

Amazon Pay द्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी असेल. याशिवाय Gift Cards, Gift Vouchers, मोबाईल रिचार्जवर ₹50 पर्यंत बचत आणि काही विमा योजनांवर ₹999 पर्यंत सूट देण्यात येऊ शकते.

Flipkart शी पुन्हा एकदा थेट स्पर्धा

Amazon ची Great Freedom Sale 7 ऑगस्टपासून सुरू होत असताना, Flipkart Freedom Sale 8 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे दोन्ही ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या सवलती, बँक ऑफर्स आणि विशेष डील्सची घोषणा करतील.

जर तुम्ही येत्या काही दिवसांत नवीन गॅझेट किंवा होम अप्लायन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Amazon आणि Flipkart या दोन्ही सेलमधील ऑफर्सची तुलना करून खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us