
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दररोज लाखो प्रवासी आणि टनन् टन माल या रेल्वेच्या माध्यमातून एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. आज जरी देशातील बहुतांश रेल्वे मार्गांचे वीजकरण (electrification) झाले असले, तरी काही भागांमध्ये अजूनही डिझेल इंजिनांचा वापर केला जातो. परंतु, एक सामान्य प्रश्न अनेकांच्या मनात येतो – ट्रेनच्या डिझेल इंजिनाच्या टाकीत किती डिझेल मावतं? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल!
भारतातील अनेक दुर्गम किंवा डोंगराळ भागांमध्ये अजूनही पूर्ण वीजपुरवठा नाही. अशा ठिकाणी डिझेल इंजिनचाच आधार घेतला जातो. विशेषतः मालवाहतूक, लांब पल्ल्याच्या ट्रेन आणि काही विशेष मार्गांवर डिझेल इंजिन वापरले जाते. या इंजिनांची कार्यक्षमता आणि त्यातील इंधनसाठा, दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
सरासरी डिझेल इंजिनाच्या टाकीत 5,000 ते 6,000 लिटर डिझेल साठवण्याची क्षमता असते. काही मोठ्या क्षमतेच्या इंजिनांमध्ये ही क्षमता 7,000 लिटरपर्यंत जाऊ शकते. डिझेल इंजिन हे पूर्णपणे फुल टाकीमध्ये हजारो किलोमीटरचं अंतर पार करू शकते. यामध्ये डब्ल्यूडीजी (WDG) मालगाडी इंजिन, WDP प्रवासी इंजिन यांचा समावेश होतो.
डिझेल इंजिनाचं मायलेज किंवा इंधन कार्यक्षमता हे सरासरी 4 ते 6 किलोमीटर प्रति लिटर असतं. मात्र, हे इंजिन किती लोड घेतं आहे, गाडीचा वेग, चढ-उतार आणि इतर घटकांवर ही कार्यक्षमता अवलंबून असते. एक फुल टाकी भरल्यानंतर ट्रेन सुमारे 20,000 ते 30,000 किलोमीटर अंतर कापू शकते, हे अर्थात वेगवेगळ्या अटींवर अवलंबून असतं.
सध्याच्या डिझेल दरानुसार (सरासरी ₹90 प्रति लिटर) जर एका इंजिनाची टाकी फुल भरायची असेल, तर सुमारे 4.5 लाख ते 6 लाख रुपये इतका खर्च फक्त डिझेलवरच होतो. त्यामुळे प्रत्येक ट्रेन चालवताना रेल्वे प्रशासनाला खर्चाचे बारकाईने नियोजन करावे लागते.
इलेक्ट्रिक विरुद्ध डिझेल जास्त फायदेशीर काय?
डिझेल इंजिनांमध्ये जरी कार्यक्षमता चांगली असली, तरी इंधनाचा खर्च आणि प्रदूषण जास्त असते. त्यामुळंच भारतीय रेल्वे आता वेगाने पूर्ण वीजकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या सुमारे 85 टक्क्यांहून अधिक रेल्वे मार्ग वीजेवर चालतात. पण, डिझेल इंजिन अजूनही पर्याय म्हणून सज्ज ठेवावे लागतात.