
भारतासह जगभरातील देशांमध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे सोशल मीडियाचाही वापर वाढला आहे. सोशल मीडिया वापरणारे लोक मोठ्या प्रमाणात इंस्टाग्रामचा वापर करतात. इंस्टाग्राम हे फक्त एक सोशल मीडिया अॅप नसून ते उत्पन्न आणि ओळखीचे एक मोठे साधन बनले आहे. त्यामुळे जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट बॅन किंवा डिसेबल झाले तर तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकते. मात्र बॅन झालेले अकाउंट रिकव्हर करणे शक्य आहे, आज आम्ही तुम्हाला अकाउंट रिकव्हर कसे करायचे याबाबत माहिती जाणून घेऊयात.
इंस्टाग्रामवर अनेकदा नको ती माहिती व्हायरल होत असते. त्यामुळे अनेक खाती बॅन केली जातात. जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट कोणत्याही चुकीशिवाय बॅन झाले असेल किंवा तुमच्याकडून चुकून असे काही पोस्ट केले असेल ज्यामुळे अकाउंट सस्पेंड झाले असेल तर ते रिकव्हर करता येते. य़ासाठी पुढील प्रोसेस वापरा.
इंस्टाग्राम अकाउंट रिकव्हर करण्याचा सोपा मार्ग
जर अकाउंट हॅक झाले असेल तर काय करायचे?
जर तुमचे अकाउंट हॅक झाले असेल, तर https://www.instagram.com/hacked या लिंकवर जा. तुमची माहिती एंटर करा आणि खाते अकाउंट झाले आहे असे सांगा. इंस्टाग्राम तुम्हाला सिक्युरिटी कोड पाठवेल, यामुळे तुम्हाला तुमचे खाते परत मिळू शकेल.