लॅपटॉपलाही चार्जिंग करणारी जगातील पहिली पॉवर बँक लाँच, किंमत तब्बल…

| Updated on: May 21, 2019 | 11:01 PM

मुंबई : स्मार्टफोमध्ये दर दुसऱ्या दिवशी काही ना काही नवीन अपडेट येत असतात. कधी स्मार्टफोनचा कॅमेरा अपग्रेड होतो तर कधी डिस्प्ले आणि प्रोसेसरमध्ये बदल होतात. टेक्नोलॉजीच्या मदतीने नेहमी स्मार्टफोनला अधिक सुविधाजनक बनवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्याच्या तुलनेत त्याच्या बॅटरी कपॅसिटीवर फार थोडं काम केलेलं दिसतं. आजही स्मार्टफोनमधील बॅटरी या जास्तीतजास्त 3500mAh ते 5000mAh इतक्या असतात. […]

लॅपटॉपलाही चार्जिंग करणारी जगातील पहिली पॉवर बँक लाँच, किंमत तब्बल...
Follow us on

मुंबई : स्मार्टफोमध्ये दर दुसऱ्या दिवशी काही ना काही नवीन अपडेट येत असतात. कधी स्मार्टफोनचा कॅमेरा अपग्रेड होतो तर कधी डिस्प्ले आणि प्रोसेसरमध्ये बदल होतात. टेक्नोलॉजीच्या मदतीने नेहमी स्मार्टफोनला अधिक सुविधाजनक बनवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्याच्या तुलनेत त्याच्या बॅटरी कपॅसिटीवर फार थोडं काम केलेलं दिसतं. आजही स्मार्टफोनमधील बॅटरी या जास्तीतजास्त 3500mAh ते 5000mAh इतक्या असतात. त्यामुळे मोबाईल चार्ज करण्यासाठी पावर बँक नेहमी सौबत ठेवावी लागते.

स्मार्टफोनची बॅटरी लवकर उतरने, या समस्येला बघता Hyper या कंपनीने एक नवीन आणि अॅडव्हान्स पावर बँक आणली आहे. या नवीन पावर बँकचं नाव HyperJuice आहे. या पावर बँकमध्ये 130W चं पावर आऊटपूट देण्यात आलं आहे. यामध्ये 2 युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आले आहेत. त्यामुळे एकाचवेळी दोन डिव्हाईस चार्ज करता येतील.

या पावर बँकने स्मार्टफोनच नाही तर Apple MacBook आणि MacBook Pro यांसारखे युएसबी टाईप-सी पावर्ड लॅपटॉपही चार्ज होऊ शकतात. हे एका स्टॅन्डर्ड युएसबी पोर्टसोबत येतं, हे 18W आऊटपूटला सपोर्ट करतं. या पावर बँकची बॅटरी कपॅसीटी 27,000mAh आहे. याने Apple MacBook Pro फुल चार्ज करता येईल असा दावा कंपनीने केला आहे.

HyperJuice पावर बँक 100W इटनपूटला सपोर्ट करते. याच्या येणाऱ्या 112W पावर अडॉप्टरने एका तासात एक डिव्हाईस फुल चार्ज करता येईल, असा दावा Hyper कंपनीने केला आहे. सिल्व्हर आणि डीप ग्रे रंगात ही पावर बँक उपलब्ध आहे. याची किंमत 1728 युआन म्हणजेच जवळपास 17,437 रुपये इतकी आहे. ही पावर बँक तुम्हा Hyper कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन ऑर्डर करु शकता.