दीर्घकाळ टिकणारा स्मार्टफोन आणि कमी किंमत असलेले फोन शोधताय तर ‘हे’ हँडसेट लिस्ट पहा

बरेच लोकं मोठी बॅटरी असलेले फोन शोधत असतात. तुम्ही जर त्यापैकी एक असाल, तर आम्ही तुम्हाला 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 7000mAh बॅटरीसह येणाऱ्या सर्वोत्तम फोनबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात...

दीर्घकाळ टिकणारा स्मार्टफोन आणि कमी किंमत असलेले फोन शोधताय तर हे हँडसेट लिस्ट पहा
smartphone
| Edited By: | Updated on: Dec 28, 2025 | 12:00 PM

आजच्या डिजिटल युगात अनेक स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होत असतात. वेगवेगळ्या ब्रँड कंपनीचे फोन आपण प्रत्येकाकडे पाहतोच. त्यात अनेकजण फोनचे फिचर आणि त्यांचा वापर इतका वाढला आहे की लोक जवळजवळ नेहमीच फोन हातात ठेवतात. सतत फोन वापरत असताना बॅटरी देखील खूप लवकर संपते. लोकांच्या सोयी लक्षात घेऊन, आजकाल स्मार्टफोन कंपन्या फोनमध्ये मोठ्या बॅटरी देखील देतात. आता सिलिकॉन कार्बन बॅटरी तंत्रज्ञानाद्वारे स्लिम फोनमध्ये मोठ्या बॅटरी देणे शक्य झाले आहे. तुम्ही जर अशातच जास्त बॅटरी असलेला फोन शोधत असाल तर तुम्हाला 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या 7000mAh बॅटरी असलेल्या फोनबद्दल जाणून घेऊयात.

रिअलमी नार्झो 90x 5जी

रिअलमीच्या या स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 13 हजार 863 रुपयांना उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 144 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.80-इंच (720 x 1570 पिक्सेल) एलसीडी डिस्प्ले, 6 एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर, 50-मेगापिक्सेल सोनी आयएमएक्स 852 मुख्य कॅमेरा आणि 7000एमएएच बॅटरीसह येतो. हे 60 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

मोटोरोला G57 पॉवर 5G

या स्मार्टफोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर 14 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 4 प्रोसेसर, 6.72 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले, 50 एमपी + 8 एमपी रियर कॅमेरा सेटअप आणि 7000एमएएच बॅटरीसह येतो. हा फोन टर्बोपॉवर 33 वॅट फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

पोको एम 7 प्लस 5 जी

सध्या या स्मार्टफोनचा 6 जीबी आणि 128 जीबी व्हेरिएंट अमेझॉनवरून 13 हजार 399 रुपयांना खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 3 5 जी प्रोसेसर, 6.9 इंचाचा डिस्प्ले, 50 एमपी एआय ड्युअल कॅमेरा आणि 7000 एमएएच बॅटरीसह येतो. हा स्मार्टफोन 33 वॅट फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.