WhatsApp वापरत असाल तर सावधान, या 4 चुका केल्यास अकाउंट होईल बॅन

WhatsApp Ban Rule : WhatsApp वापरताना तुम्ही काही चुका केल्यास तुमचे अकाउंट बॅन होण्याची शक्यता असते. तुमच्याकडूनही खालील चुका झाल्यास तुम्हाला फटका बसू शकतो, याबाबत माहिती जाणून घेऊयात.

WhatsApp वापरत असाल तर सावधान, या 4 चुका केल्यास अकाउंट होईल बॅन
Whatsapp
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 30, 2025 | 7:54 PM

स्मार्टफोन वापरणारा जवळपास प्रत्येक व्यक्ती WhatsApp वापरतो. तु्म्हीही हे अॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. WhatsApp वापरताना तुम्ही काही चुका केल्यास तुमचे अकाउंट बॅन होण्याची शक्यता असते. WhatsApp सतत स्पॅम, बनावट अॅप्स आणि गैरवापरावर कारवाई करत असते. यामध्ये दरमहा लाखो नंबर ब्लॉक केले जातात. तुमच्याकडूनही खालील चुका झाल्यास तुमचा नंबरही ब्लॉक होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनोळखी लोकांना मेसेज करणे

बरेच लोक अनोळखी लोकांना मेसेज करत असतात. व्हॉट्सअॅपच्या मते, जे लोक अज्ञात लोकांना मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवण्यात आले तर तुम्हाला फटका बसू शकतो. ज्या लोकांकडे तुमचा नंबर नाही अशा लोकांना तुम्ही मेसेज पाठवत असाल आणि एखादा मजकूर वारंवार फॉरवर्ड करत असाल तर हे स्पॅम मानले जाते. यामुळे WhatsApp सिस्टम आपोआप तुमचे खाते ब्लॉक करू शकते.

शिवीगाळ, धमकी दिल्यास कारवाई होऊ शकते

व्हॉट्सअॅपवर शिवीगाळ, ब्लॅकमेल, धमक्या किंवा इतर कोणत्याही प्रकारची माहिकी शेअर करणे कंपनीच्या नियमांविरुद्ध आहे. जर एखाद्या युजरने असे मेसेज पाठवले आणि त्याच्या विरोधात दोन किंवा तीन वैध तक्रारी आल्या तर त्याचे खाते कायमचे निलंबित केले जाऊ शकते.

बनावट अ‍ॅप्स वापरणे धोकादायक

बरेच लोक व्हॉट्सअॅप प्लस आणि जीबी व्हॉट्सअॅप सारख्या अ‍ॅप्सचा वापर करतात. हे व्हॉट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन आहे. या अ‍ॅप्समुळे चॅटची सुरक्षितता धोक्यात येते तसेच तुमच्या फोनमध्ये मालवेअर येण्याचा धोका वाढतो. व्हॉट्सअॅपला हे समजताच असे खाते ताबडतोब ब्लॉक करण्यात येते.

वारंवार एकच चूक केल्यास अकाउंट निलंबिक होऊ शकतो

काही चुका केल्यास व्हॉट्सअॅप पहिल्यांदाच काही तास किंवा काही दिवसांची तात्पुरती बंदी घालते. मात्र सुचना दिल्यावरही जर युजर त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असेल तर कंपनी त्या युजरवर त्वरित कायमची बंदी घालू शकते. त्यामुळे तुम्हाला अशी एखादी चेतावणी आली असेल तर तुम्ही तुमचे वर्तन सुधारणे आवश्यक आहे.

अकाउंट बॅन झाल्यास काय होईल ?

तुमचे अकाउंट बॅन झाल्यास त्या नंबरवरून WhatsApp वापरता येणार नाही. तसेच सर्व चॅट्स, मीडिया, ग्रुप्स आणि बिझनेस डेटा नष्ट होईल. यानंतर तुम्हाला WhatsApp पुन्हा सुरू करायचे असेल तर नवीन नंबर खरेदी करावा लागेल आणि त्यावर WhatsApp सुरू करावे लागेल.