AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्स्टाग्रामवर असे वाढतील फॉलोअर्स, ही ट्रिक्स वापरुन तर पाहा

Instagram | इन्स्टाग्रामवर केवळ व्हिडिओ तयार करुन आणि अपलोड करुन फॉलोअर्सची संख्या लागलीच वाढते असे नाही. पण या एका ट्रिकमुळे तुमचे फॉलअर्स वाढण्यात मोठी मदत होईल. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसा खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करा, अपलोड करा. यामुळे तुमच्या फॉलोअर्सची संख्या वाढेल..

इन्स्टाग्रामवर असे वाढतील फॉलोअर्स, ही ट्रिक्स वापरुन तर पाहा
| Updated on: Nov 01, 2023 | 5:48 PM
Share

नवी दिल्ली | 1 नोव्हेंबर 2023 : Instagram आता समाज माध्यमांसाठी असा प्लॅटफॉर्म झाला आहे की, अनेक लोक त्यावर लाखो रुपयांची कमाई करत आहेत. इन्स्टाग्रामवर पैसा कमविण्यासाठी अगोदर खर्च करावे लागतात, असा काहीचा समज आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. तो एडिट करायचा आणि नंतर हा व्हिडिओ अपलोड करायचा असा काहींचा समज आहे. पण असं करण्याची गरज नाही. तुम्ही या ट्रिक्स आणि टिप्सच्या मदतीने तुमचे चाहते वाढवू शकतात. त्यासाठी ही वेबसाईट महत्वाची आहे. व्हिडिओ डाऊनलोड करुन तुम्हाला काही दिवसांतच फॉलोअर्स संख्या वाढू शकते.

असे वाढतील फॉलोअर्स

या Instagram Trick तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरतील. त्यामुळे सहज तुमच्या फॉलोअर्सची संख्या वाढेल. तुम्ही फॉलोअर्सची संख्या वाढण्यासाठी पेड पार्टनरशिपसारख्या प्रकल्पात पण सहभागी होऊ शकतात. त्यामाध्यमातून तुमची जबरदस्त कमाई होईल. इस्टाग्रामवर असे काही अकाऊंट्स आहेत, ज्यांनी केवळ 50 व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 1.1 दशलक्ष आहे. केवळ 50 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण असा करिष्मा करता येऊ शकतो.

ही आहे सोपी पद्धत

  1. सर्वात अगोदर Instagram वर एक नवीन पेज तयार करा. त्यानंतर गुगलवर जा. याठिकाणी Pixabay सर्च करा. याठिकाणी तुम्हाला फ्री इमेज आणि व्हिडिओ मिळतील. Choose Media Type हा पर्याय निवडा आणि व्हिडिओ टॅप करा.
  2. व्हिडिओवर जाऊन Nature निवडा. वर असलेले फिल्टर हा पर्याय निवडा. नंतर Orientation मध्ये जाऊन व्हर्टिकल हा पर्याय निवडा. त्यानंतर अप्लाय या बटणावर क्लिक करा.
  3. अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ व्हर्टिकल ऑप्शन मिळतील. यातील जो पण व्हिडिओ येईल, त्यावर टॅप करा. व्हिडिओ डाऊनलोड करा. व्हिडिओ डाऊनलोड केल्यानंतर या व्हिडिओला एक जोरदार ऑडिओ क्लिप जोडा आणि व्हिडिओ पोस्ट करा.
  4. सातत्याने असे व्हिडिओ पोस्ट करा. काही दिवसांत Instagram Followers फॉलोअर्सची संख्या वाढेल. फॉलोअर्स वाढल्यानंतर तुम्ही स्पॉनरशिप वा ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करु शकता.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.