आरारारा खतरनाक! 65 इंचाचा स्मार्ट टीव्ही 14 हजारांनी स्वस्त, फ्लिपकार्टवर मिळतेय जबरदस्त सूट

तुमचा जुना टीव्ही बदलण्याची किंवा नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याची योजना आहे का? फ्लिपकार्टवर इन्फिनिक्स 65 इंच QLED स्मार्ट टीव्हीवर बंपर ऑफर मिळत आहे. 54,999 रुपयांचा हा 4K अल्ट्रा HD टीव्ही तुम्हाला बँक ऑफर्ससह फक्त 38,949 रुपयांना मिळेल, ज्यामुळे 14,000 रुपयांहून अधिक बचत होईल. यात उत्कृष्ट डिस्प्ले, डॉल्बी ऑडिओ आणि गुगल टीव्ही ओएस सारखे फिचर्स आहेत. ही संधी सोडू नका!

आरारारा खतरनाक! 65 इंचाचा स्मार्ट टीव्ही 14 हजारांनी स्वस्त, फ्लिपकार्टवर मिळतेय जबरदस्त सूट
Infinix 65-inch QLED Smart TV
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2026 | 1:59 PM

तुमच्या घरातील टीव्ही बिघडला आहे? तुम्हाला घरातील जुन्या टीव्हीचा कंटाळा आलाय? मग चिंता करू नका. तुम्हाला एक नवीन स्मार्ट टीव्ही, तोही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची आयतीच संधी चालून आली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरील एक जबरदस्त डील तुम्हाला सांगणार आहोत. या डीलची माहिती वाचल्यावर तुम्ही लागलीच हा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा निर्णय घ्याल. कारण तुमच्या पैशाची प्रचंड बचत होणार आहे. तुम्ही कल्पना करू शकणार नाही, एवढी बचत होणार आहे.

या डीलमध्ये तुम्हाला जबरदस्त ऑफर मिळत आहे. 65 इंचाचा स्मार्ट टीव्ही तुम्हाला 14 हजार रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे. त्याचे खास फिचर्स खाली दिले आहेत. या स्मार्ट टीव्हीची एकूण किंमत, त्याचे फिचर्स आणि डीलची माहिती घ्या जाणून.

Loading...

कोणत्या टीव्हीवर डील?

Infinix 65GU2Q QLED Smart TV वर ही जोरदार डील मिळत आहे. फ्लिपकार्टच्या ऑफिशियल पेजवर ह्या टीव्हीची MRP 54,999 देण्यात आली आहे. पण या डीलनुसार तुम्हाला हा टीव्ही 40,999 रुपयात मिळणार आहे. त्याशिवाय तुम्ही हा टीव्ही बँक ऑफरच्यासह खरेदी करू शकता. त्यामुळे याची किंमत कमी होऊन 38,949 रूपये होईल. या टीव्हीच्या फिचर्सबाबत जाणून घेऊया.

डिस्प्लेची क्वॉलिटी आणि साईज

कोणताही स्मार्ट टीव्ही खरेदी करताना त्याची साईज आणि डिस्प्लेची क्वालिटी पाहिली जाते. या टीव्हीत तुम्हाला 165 सेंटीमीटर म्हणजे 65 इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. अप्रतिम व्यूइंग अँगल आणि कलर क्वॉलिटीसाठी यात QLED पॅनल देण्यात आला आहे. 4K अल्ट्रा HD चा सपोर्टही देण्यात आला आहे. त्यासोबतच स्मूथ आणि फ्लूइड एक्सपिरियन्ससाठी यात 60Hzचा रिफ्रेश रेट मिळणार आहे.

टीव्हीचा साऊंड कसा?

चांगल्या पिक्चर क्वॉलिटीसह टीव्हीत चांगली साऊंड क्वॉलिटी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. या टीव्हीत दोन स्पीकर्स देण्यात आले आहेत. ते 48W चे आऊटपूट देते. यासोबतच यात Dolby Audio चा सपोर्टही दिल्या जातो. त्यामुळे तुम्हाला चांगला ऑडिओ एक्सपीरिअन्स मिळेल.

टीव्हीचा परफॉर्मन्स कसा आहे?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीव्हीचा परफॉर्मन्स. स्मार्ट टीव्हीत वापर करताना त्यात लॅग येऊ नये. त्यासाठी Infinix च्या या स्मार्ट टीव्हीत Google TV ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी यात 2GB RAM आणि 16GB स्टोअरेज देण्यात आला आहे. याशिवाय या टीव्हीत 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हीटीसाठी यात Wi-Fi आणि Bluetooth चा सपोर्टही देण्यात आला आहे. जर तुम्ही नॉर्मल टीव्हीला बोअर झाला असाल आणि तुम्हाला भव्यदिव्य टीव्ही खरेदी करायचा आअसेल तर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये हा टीव्ही खरेदी करू शकता. तुमच्यासाठी हा टीव्ही एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us