प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेरा… लाँच होण्यापूर्वी आयफोन १७ प्रोचे हे ३ ‘प्रो’ फीचर्स जाणून घ्या

जर तुम्हाला सप्टेंबरमध्ये लाँच होणाऱ्या आयफोन 17 प्रो बद्दल जाणून घ्यायचे असेल, तर लाँच होण्यापूर्वी फोनचे प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेरा कसे असणार आहेत तसेच या फोनच्या तीन प्रो फीचर्सबद्दल जाणून घेऊयात...

प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेरा... लाँच होण्यापूर्वी आयफोन १७ प्रोचे हे ३ प्रो फीचर्स जाणून घ्या
iphone 17 pro
| Edited By: | Updated on: Aug 07, 2025 | 8:26 PM

सप्टेंबरमध्ये ग्राहकांसाठी आयफोन 17 सिरीज लाँच केली जाऊ शकते आणि या वर्षी या सिरीजमध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स आणि नवीन व्हेरिएंट आयफोन 17 एअर लाँच केले जाऊ शकतात. मात्र या आगामी मॉडेल्सबद्दल माहिती सध्या मर्यादित आहे, परंतु अधिकृत लाँच होण्यापूर्वी आतापर्यंत आयफोन 17 प्रोबद्दल समोर आलेल्या माहिती बद्दल आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

आयफोन 17 प्रो: प्रोसेसर-रॅम-स्टोरेज आणि बॅटरी तपशील

हा आगामी स्मार्टफोन A19 Pro बायोनिक चिपसेट, 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. जर असे झाले तर आयफोन 16 Pro च्या तुलनेत, या वर्षी लाँच होणाऱ्या या प्रो मॉडेलमध्ये 4 GB अतिरिक्त रॅम मिळू शकते.

तसेच आयफोन 17 प्रो लाँच होण्यापुर्वी असा अंदाज लावला जात आहे की फोनमध्ये 5500 mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली जाऊ शकते जी 25 W MagSafe फास्ट चार्ज आणि 15 W Qi2 वायरलेस सपोर्टसह येऊ शकते.

आयफोन 17 प्रो कॅमेरा

आयफोन 17 प्रो मध्ये तीन रियर कॅमेरे असण्याची अपेक्षा आहे ज्यामध्ये 8 Kव्हिडिओ कॅप्चर सपोर्टसह 48 एमपी प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 48 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 48 एमपी पेरिस्कोप-स्टाईल टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. त्यातच सेल्फी प्रेमींसाठी फोनच्या समोर 24 -मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.

डिझाइन

सप्टेंबरमध्ये लाँच केल्या जाणात्या या आयफोन मॉडेलमध्ये स्लीक फ्रंट डिझाइन आणि डायनॅमिक आयलंडमध्ये सेल्फी कॅमेरा असू शकतो. मागील बाजूस एक रुंद आयताकृती कॅमेरा मॉड्यूल असेल ज्यामध्ये तीन लेन्स आणि एक फ्लॅश असू शकतो. याशिवाय, मॅगसेफ चार्जिंग सपोर्टशी चांगले समन्वय साधण्यासाठी अॅपलचा लोगो थोडा खाली ठेवला जाऊ शकतो.

आयफोन 17 प्रो ची किंमत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयफोन 17 सिरीजमध्ये लाँच होणाऱ्या या प्रो मॉडेलच्या बेस व्हेरिएंटची किंमत 1 लाख 45 हजार 990 रुपये असू शकते. हे मॉडेल पाच रंगांमध्ये लाँच केले जाऊ शकते – ऑरेंज, डार्क ब्लू, व्हाइट, ग्रे आणि ब्लॅक. लाँच झाल्यानंतर लवकरच या फोनची विक्री सुरू होण्याची अपेक्षा आहे, सध्या फोनच्या विक्री तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.