iPhone 17 मध्ये नसणार सिम स्लॉट ?,या देशांना ई-सिम वापरावे लागणार

Apple येत्या 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या इव्हेंटमध्ये आपल्या आयफोन 17 सिरीजला लाँच करु शकतो. परंतू अनेक देशात आयफोनच्या मॉडेल्समध्ये सिम स्लॉट दिला जाणार नाही. हे देश कोणते ? कोणत्या देशांनी ई-सिमचा वापर करावा लागणार पाहा

iPhone 17 मध्ये नसणार सिम स्लॉट ?,या देशांना ई-सिम वापरावे लागणार
| Updated on: Sep 01, 2025 | 8:50 PM

Apple च्या आगामी Awe Dropping इव्हेंटमध्ये 9 सप्टेंबरला iPhone 17 Series पेश होणार आहे. आतापर्यंत कंपनी जेव्हा कोणतीही आयफोन सिरीज लाँच करते तेव्हा त्याच्या आधी चर्चा सुरु होते. यावेळी सर्वात मोठी चर्चा फिजिकल सिम स्लॉट संपूर्णपणे गायब होणार आहे. याचा अर्थ iPhone 17 मालिकेचे सर्व मॉडेल आता केवळ eSIM सपोर्टसह बाजारात येऊ शकतात.

कोणत्या देशात सिम स्लॉट नसणार ?

सध्या अमेरिकेत iPhone 14 पासून सिम -ट्रे हटवून eSIM-only मॉडेल दिले जात आहेत. परंतू आता रिपोर्ट्स सांगते हा बदल आता युरोपातील अनेक देशातही लागू शकणार आहे. यात फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि नेदरलँड सामील होऊ शकतात.

मॅकरुमर्सच्या अहवालाच्या मते Apple ने या देशात आपल्या ऑथराईज्ड रीसेलर्ससाठी eSIM शी जुळलेला ट्रेनिंग प्रोग्रॅम कंपलसरी केलेला आहे. कर्मचाऱ्यांना हे ट्रेनिंग 5 सप्टेंबरपर्यंत Apple च्यआ SEED ऐपद्वारे पूर्ण करावे लागणार आहे.

iPhone साठी eSIM का गरजेचे आहे ?

Apple ने 2022 मध्ये iPhone 14 सीरीजपासून अमेरिकेत फिजिकल सिम स्लॉट हटवणे सुरु केले होते. आता iPhone 17 सीरीजसह हे पाऊल आता मोठ्या मार्केटपर्यंत वाढू शकते. याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे सिम चोरीला जाण्याची भिती रहात नाही. लागलीच एक्टीवेट आणि डीएक्टीवेट केले जाऊ शकते. एकाच फोनमध्ये अनेक प्रोफाईल वापर करण्याची सुविधा असते.

भारतातही येणार का eSIM-only iPhone?

आतापर्यंत भारतासारख्या देशातील बाजारात फिजिकट सिम स्लॉट आणि eSIM दोन्हींचे ऑप्शन देण्यात आले आहे. परंतू हा बदल पाहून वाटते की आता भविष्यात भारतासारख्या अनेक देशातही iPhones संपूर्णपणे eSIM-only होऊ शकतो.

Apple Event काय असणार खास ?

iPhone 17 Series मधील डिझाईन आणि फिचर्स पाहायला मिळू शकतात. या शिवाय नवीन iOS अपडेट्स, eSIM-only मॉडल्सची घोषणा आणि काही नवीन Apple Watch आणि Mac डिव्हाईस देखील एंट्री करु शकतात.