iPhone Duo : ना फोन पडला, ना उघडला; तरी iPhone Duo च्या स्क्रीनला तडा? Apple कंपनीने तडकाफडकी उचललं मोठ पाऊल!

फोन खरेदी करून किंवा वापरून अवघे काही दिवस नाही झाले तेच लोकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. लाखो रूपये देऊन खरेदी केलेला हा फोन असा बिघडल्याने अनेकांना धडकी भरली आहे. आता त्याचा रिपेअरचा खर्च देखील हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

iPhone Duo : ना फोन पडला, ना उघडला; तरी iPhone Duo च्या स्क्रीनला तडा? Apple कंपनीने  तडकाफडकी उचललं मोठ पाऊल!
iphone duo crack news
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 01, 2026 | 4:15 PM

iPhone 18 pro max या फोनची क्रेझ प्रचंड पसरली होती. त्यासोबतच वेड लावले होते ते iPhone च्या फोल्डेबल फोनन म्हणजेच iPhone Duo याने. फोन जसा लाँच झाला तसा काही दिवसांतच त्याचा स्टॉक संपल्याच्या बातम्या आपण ऐकल्या.पण आता याच्या तक्रारी समोर येताना दिसत आहेत.

फोन खरेदी करून किंवा वापरून अवघे काही दिवस नाही झाले तेच लोकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. लाखो रूपये देऊन खरेदी केलेला हा फोन असा बिघडल्याने अनेकांना धडकी भरली आहे. मिळालेल्या तक्रारीनुसार त्याच्या स्क्रिनवर पांढऱ्या लाईन्स दिसत आहेत. तसेच स्क्रिनवर क्रॅक पडल्याचेही निदर्शनास आले आहे. या़चे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या तक्रारींची आता Apple ने आता गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी Apple ने आता रिटेल स्टोअर्स आणि अधिकृत सर्व्हिस सेंटरमधील कर्मचाऱ्यांसाठी नवे निर्देश जारी केले आहेत.

Loading...

स्क्रिनला तडे जाण्याचं कारण काय?

काही ग्राहकांनी फोनच्या मधल्या घडीच्या भागाजवळ म्हणजेच हिंजजवळ स्क्रिनला तडे गेल्याचे फोटो शेअर केल्या आहेत. ऑस्टेलियातील एका ग्राहकाने तर फोन उघडला नसतानाही त्याला स्क्रिनला तडा गेल्याचं सांगितलं आहे. दरम्यान दुरूस्तीविषयक माहिती देणाऱ्या iFixit या वेबसाईटने फोनची तपासणी केल्यानंतर हिंजच्या यंत्रणेत काही त्रुटी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.फोन बंद करताना हिंजमधील सेंट्रल सपोर्ट बार अपेक्षेपेक्षा जास्त मागे सरकत नसल्यास स्क्रिनला तडा जाऊ शकतो. असा iFixit चा अंदाज आहे. मात्र Apple ने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.

मोजक्याच फोनमध्ये समस्या

Apple ने याआधीच iPhone Duo च्या काही मोजक्या यूनिट्समध्ये इनर डिस्प्लेशी संबंधित काही समस्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. कंपनीच्या म्हणण्यांनुसार बहुतांश फोनमध्ये ही अडचण ज्या फोनमध्ये समस्या आहे. त्यामध्ये वापर सूरू केल्यानंतर लवकरच स्क्रिनवर दोष दिसू शकतो. अशा ग्राहकांना AppleCare शी संपर्क साधून रिप्लेसमेंटसाठी मदत घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

MacRumors च्या वृत्तानुसार Apple ने अंतर्गत मेमोद्वारे टेक्निशियन्सना अशा तक्रारी आल्यास संबंधित फोनची तपासणी करण्यास सांगितले आहे. तपासणीनंतर कंपनीच्या नियमित सर्व्हिस प्रक्रियेनुसार फोन दुरूस्त करायचा किंवा बदलून द्यायचा असे निर्देश देण्यात आले आहेत.

स्क्रिन दुरूस्तीचा खर्चही मोठा
iFixit च्या माहितीनुसार, फोनची वॉरंटी संपल्यानंतर इनर स्क्रिन दुरूस्त करण्यासाठी 999 डॉलरपर्यंत खर्च येऊ शकतो. म्हणजेच भारतीय रूपयांनुसार 95,000 पर्यंत दुरूस्तीचा खर्च आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us