जिओचा धमाका, 2500 ते 3000 रुपयात जिओ 5 जी स्मार्टफोन लाँच करणार

| Updated on: Oct 19, 2020 | 10:03 AM

रिलायन्स जिओ लवकरच आपला 5G स्मार्टफोन 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्याच्या तयारीत आहे (Jio launch new smartphone).

जिओचा धमाका, 2500 ते 3000 रुपयात जिओ 5 जी स्मार्टफोन लाँच करणार
Follow us on

मुंबई : रिलायन्स जिओ लवकरच आपला 5G स्मार्टफोन 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्याच्या तयारीत आहे (Jio launch new smartphone). लाँच केल्यानंतर हळूहळू या स्मार्टफोनची किंमत 2500-3000 रुपये केली जाणार. कंपनी हा फोन विकण्यासाठी 20 ते 25 कोटी मोबाईल फोन युझर्सला टार्गेट करत आहे, जे सध्या 2G फोनचा वापर करत आहेत (Jio launch new smartphone).

मिंटने दिलेल्ला माहितीनुसार एका कंपनीने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जिओ पाच हजार रुपये किमतीचा फोन लाँच करणार आहे. लाँच केल्यानंतर जेव्हा फोनची विक्री वाढेल तेव्हा जिओ या फोनची किंमत 2500 ते 5000 रुपये करुन शकते. रिलायन्सच्या 43 व्या अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारत 2G मुक्त करण्याची आणि अफोर्डेबल किंमतीत 5जी फोन विकण्याची ईच्छा व्यक्त केली.

गुगलच्या भागीदारीचा फायदा होणार

जिओचा हा फोन लाँच करण्यामध्ये जिओला गुगलच्या भागीदारीचा फायदा होणार. काही महिन्यापूर्वीच गुगलने जिओमध्ये 4.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली. गुगलकडून अँड्रॉईड बेस स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यासाठी पार्टनरशिप केली. जिओचा स्वस्त स्मार्टफोन गुगलच्या भागीदारीत लाँच केला जाईल.

या कंपन्यांना मिळणार टक्कर

5 जी स्मार्टफोनची सुरुवात 27 हजार रुपये आहे. आताच्या सर्व मोठ्या कंपन्या शाओमी, रिअलमी, ओप्पो, विवो, अॅपल आणि सॅमसंग 5 जी स्मार्टफोन लाँच करत आहेत. ज्यांची किंमत खूप आहे आणि जिओचा हा कमी किमतीचा 5 जी स्मार्टफोन पूर्ण मार्केट आपल्याकडे खेचून घेऊ शकतो.

जिओ अशी कंपनी आहे की, त्यांनी यापूर्वीही कमी किमतीत 4 जी फोन विकले होते. कंपनीने या फोनसाठी ग्राहकांकडून 1500 रुपये घेतले होते. जे रिफंडेबल होते. ग्राहक कंपनीला फोन देऊन डिपॉझिट केलेले पैसे पुन्हा मिळवू शकतात.

संबंधित बातम्या :

‘मेड इन इंडिया’चा नारा देत Micromax भारतीय बाजारात पुनरागमन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Oppo चा एआय ट्रिपल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच, किंमत 10,990 रुपये, जाणून घ्या फिचर्स