Jio : 51 कोटी ग्राहकांना मोठा फायदा, या नव्या प्लॅनमध्ये मिळणार जास्त व्हॅलिडिटी

Jio Plan : जिओकडे आपल्या कोट्यवधी यूजर्ससाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीने आता यूजर्सची मोठी चिंता दूर केली आहे. 28 दिवसांच्या प्लॅनपासून आता दिलासा मिळाला आहे.

| Updated on: May 06, 2026 | 10:32 PM
1 / 5
देशातील नंबर 1 टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओकडे सुमारे 51 कोटी यूजर्स आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि परवडणारे अनेक रिचार्ज प्लॅन्स देत असते. यूजर्सच्या गरजेनुसार जिओ वेळोवेळी नवीन प्लॅन्सही लॉन्च करत असते.

2 / 5
आतापर्यंत जिओकडे 56 दिवस, 72 दिवस, 84 दिवस, 90 दिवस, 98 दिवस, 200 दिवस आणि 336 दिवसांची वैधता असलेले अनेक प्लॅन्स उपलब्ध होते. मात्र आता कंपनीने एक नवीन स्वस्त प्लॅन सादर केला आहे.

3 / 5
जिओचा हा नवीन प्रीपेड प्लॅन 450 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 36 दिवसांची वैधता मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS, दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे.

4 / 5
या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदेही दिले जातात. यात JioHotstar चे 3 महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन, 50GB Jio AI Cloud स्टोरेज देखील दिले जात आहे.

5 / 5
या प्लॅनमुळे आता यूजर्सना वारंवार रिचार्ज करण्याची चिंता मिटणार आहे. याची व्हॅलिडिटी 36 दिवसांची असल्यामुळे 28 किंवा 30 दिवसांच्या मर्यादेतून दिलासा मिळणार आहे.

Follow Us