AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma: 19 वर्षापूर्वीचा तो दिवस, आणि… पद्मश्री पुरस्कार मिळताच रोहित शर्मा भावुक

दिल्लीतील राष्ट्रपती भवनात रंगलेल्या या सोहळ्यात रोहित शर्माला देशाचा तिसऱ्या सर्वोच्च पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. आता यानंतर रोहितने एक भावूक पोस्ट शेअर केली.

Rohit Sharma: 19 वर्षापूर्वीचा तो दिवस, आणि... पद्मश्री पुरस्कार मिळताच रोहित शर्मा भावुक
rohit sharma
| Updated on: Jun 24, 2026 | 9:19 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारताला 2024 चा टी-20 विश्वचषक व 2025 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारे कर्णधार रोहित शर्मा यांना, गेल्या दोन दशकांतील भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात रोहित शर्मा यांचा सन्मान केला. रोहित शर्मा यांनी भारतासाठी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना 23 जून 2007 रोजी खेळला होता. पजानेवारीमध्ये हे पद्मश्री पुरस्काराची नावे घोषित केली होती. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आता यानंतर पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर रोहितने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टची आता जोरदार चर्चा होत आहे.

रोहित शर्माने पोस्टमध्ये लिहिले की, “23 जून हा दिवस खूप जादू घेऊन येतो. 19 वर्षांपूर्वी, भारताची कॅप मिळण्याने या सगळ्याची सुरुवात झाली होती. आज, यात आणखी एका अभिमानास्पद अध्यायाची भर पडली आहे.” रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. रोहितने तिन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाजी आणि कर्णधारपद या दोन्हीमध्ये प्रभावी कामगिरी दाखवली आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून करून, रोहितने 2013 मध्ये सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली. रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने 19 सप्टेंबर 2007 रोजी टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि नोव्हेंबर 2013 मध्ये कसोटी पदार्पण केले.

रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहितने 67 कसोटी, 285 एकदिवसीय आणि 159 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 12 शतकांसह 4.301 धावा, एकदिवसीय सामन्यांमध्ये 33 शतके आणि 62 अर्धशतकांसह 11,720 धावा आणि टी20 मध्ये 5 शतके आणि 32 अर्धशतकांसह 4,231 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक द्विशतके (3) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (653) करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील 264 धावांच्या सर्वोच्च खेळीचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

धोनीनंतर रोहित हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कप, टी-20 विश्वचषक 2024 आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीतही पोहोचला होता.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?