Jio चे 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे 6 रिचार्ज, 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतात अनेक लाभ
Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त रिचार्ज प्लान देखील आहेत. जिओ कंपनीकडे २०० रुपयांत कमी किंमतीत ६ असे प्लान येतात. ज्यात ३० दिवसांची व्हॅलिडिटी, JioHotstar सारखे अनेक बेनिफिट्स मिळतात.

Jio कडे दोनशे रुपयांहून कमी किंमतीचे सहा स्वस्तातील रिचार्ज प्लान आहे, यात युजर्सना ३० दिवसांची वैधता , JioHotstar चे सब्सक्रिप्शनसह अनेक बेनिफिट्स मिळतात. जिओने खास करुन या स्वस्त रिचार्ज प्लानला क्रिकेट डेटा पॅक नावाने उतरवले आहे. जिओ हॉटस्टारवर तुम्ही क्रिकेट मॅचसह पसंतीच्या वेबसिरीज आणि मुव्हीजचा लाभ घेऊ शकता. चला तर जिओच्या या ६ प्लान्सची माहिती घेऊयात….
१९५ रुपयांचा प्लान
जिओचा हा १९५ रुपयांचा प्लान ३० दिवसांच्या व्हॅलिडीटी सह येतो. यात युजर्सना ९० दिवसांचे JioHotstar चे सब्सक्रिप्शन मिळते. हा एक डेटा ऐड-ऑन प्लान आहे.ज्यात १५ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर दिली जाते. या प्लानला युजर्सना रेग्युलर प्लान सोबत घेऊ शकता. या प्लानमध्ये ६.५० रुपयांचा बॅलन्स मिळत आहे.
१४९ रुपयांचा प्लान
जिओचा हा १४९ रुपयांचा प्लान देखील ३० दिवसांच्या वैधतेसह मिळतो. या युजर्सना ९० दिवसांसाठी JioHotstar चे सब्सक्रिप्शन मिळते.हा देखील एक डेटा ऐड-ऑन प्लान आहे. ज्यात १० जीबी हायस्पीड डेटा ऑफर केला जातो. या प्लानला देखील युजर्स रेग्युलर प्लान सोबत घेऊ शकता. या प्लानमध्ये ४.९७ रुपयांचा बॅलन्स मिळतो.
१३९ रुपयांचा प्लान
जिओचा हा १३९ रुपयांचा प्लान देखील ७ दिवसांच्या वैधतेसह येतो. हा देखील एक डेटा ऐड-ऑन प्लान आहे. यात १२ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. या प्लान देखील युजर्स रेग्युलर प्लानसोबत घेऊ शकता. याशिवाय १९.८६ रुपयांचा बॅलन्स देखील मिळते.
१०० रुपयांचा प्लान
जिओचा हा १०० रुपयांचा प्लान ३० दिवसांच्या व्हॅलिडीटी सोबत येतो. हा देखील एक डेटा-ऐड-ऑप प्लान आहे. ज्यात ६ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. यासोबत JioHotstar चा ३० दिवसाचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानसोबत देखील युजर्स रेग्युलर प्लान सोबत घेऊ शकतात. याशिवाय ३.३३ रुपयांचा बॅलन्स देखील मिळतो.
७९ रुपयांला प्लान
जिओचा हा प्लान देखील ३० दिवसांच्या वैधतेसह मिळतो. हा देखील एक डेटा ऐड-ऑन प्लान होते. ज्यात ३ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. या सोबत JioHotstar चा ३० दिवसांचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानला देखील युजर्स रेग्युलर प्लान सोबत येतो. याशिवाय २.६३ रुपयांचा बॅलन्स देखील मिळतो.
४९ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओच्या प्लानमध्ये १ दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. हा देखील एक डेटा ऐड-ऑन प्लान आहे. ज्यात २५ जीबी हायस्पीड डेटा ऑफर केला जात आहे.या प्लानला देखील युजर्स रेग्युलर प्लान सोबत घेऊ शकतो.