AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 20 रुपयांत देखील एक्टीव्ह ठेवू शकता Jio, Airtel, Vi चे सिम, काय आहे फॉर्म्युला जाणा

TRAIच्या नियमानुसार तुम्ही केवळ २० रुपये खर्च करुन देखील तुमचा नंबर दीर्घकाळापर्यंत बंद होण्यापासून वाचवू शकता. चला, तर पाहूयात ट्रायच्या या संदर्भात काय गाईडलाईन आहेत.

अवघ्या 20 रुपयांत देखील एक्टीव्ह ठेवू शकता Jio, Airtel, Vi चे सिम, काय आहे फॉर्म्युला जाणा
file photos
| Updated on: Apr 27, 2026 | 8:21 PM
Share

जर तुम्ही तुमच्या प्रीपेड मोबाईल नंबरला ९० दिवसांहून जास्त वेळ रिचार्ज केले नाही तर आणि नंबर इनएक्टीव्ह ठेवला तर टेलिकॉम कंपन्या तुमचा नंबर अन्य युजरला अलॉट करु शकतात. एकदा सिम बंद झाल्यावर आणि कोणा दुसऱ्याला नंबर अलॉट झाल्यानंतर तुमच्या हातात काही राहात नाही. तुम्ही त्या नंबरला पुन्हा तुमच्या नावावर करु शकत नाही.मात्र, आता TRAI च्या नव्या नियमानुसार केवळ २० रुपयात तुम्ही तुमचा नंबर कार्यरत ठेवू शकता. कसे ते पाहूयात….

जुलै २०२४ पासून खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लान महाग केले आहेत. ज्यामुळे दोन सिम वापरणारे बहुतांशी युजर त्यांचा सेकेंडरी नंबर रिचार्ज करु शकत नाहीत. मात्र, तुमच्याकडेही एखादा सेकेंडरी नंबर असेल, ज्याला तुम्ही कमी खर्चात एक्टीव्ह ठेवू इच्छीत आहात तर तुम्हाला केवळ २० रुपये खर्च करावे लागणार आहेत. म्हणजे केवळ २० रुपये खर्च करुन तुम्ही तुमचा Jio, Airtel वा Vodafone Idea चा नंबर दीर्घकाळ सक्रीय ठेवू शकता.

काय आहे फॉर्म्युला ?

दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, जर कोणत्या नंबरला ९० दिवसांपर्यंत वापरले गेले नाही वा रिचार्ज केला नाही आणि त्यात २० रुपयांचे बॅलन्स असेल तर टेलिकॉम ऑपरेटर २० रुपये कापून पुढील ३० दिवसांपर्यंत नंबर एक्टीव्ह ठेवतील. जर तुमच्याकडे असा कोणताही सेकेंडरी क्रमांक आहे, ज्याला तुम्ही कमी वापरता वा वारंवार रिचार्ज करु इच्छीत नाही,तर त्यात २० रुपयांचा बॅलन्स ठेवावा. असे केल्याने तुमचा नंबर पुढील अतिरिक्त ३० दिवसापर्यंत एक्टीव्ह राहू शकतो. म्हणजे १२० दिवसांपर्यंत नंबर बंद होणार नाही.

याशिवाय तुम्ही तुमच्या नंबरला जिओ, एअरटेल वा व्होडाफोनच्या वॉईस ओन्ली वाल्या स्वस्तातल्या प्लानसोबत रिचार्ज करु शकता. असे केल्याने तुमच्या नंबरवर कॉलिंगच्या सोबत इनकमिंग आणि आऊट गोईंग एसएमएसची सुविधा देखील मिळेल. खाजगी टेलिकॉम कंपन्या ८४ दिवसांपासून ३६५ दिवसांपर्यंत व्हॉईस ओन्ली प्लानची ऑफर करत असतात.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल