AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Pakistan Protest : भारतानंतर या देशात ‘कॉकरोच’चं महावादळ, सरकारची झोप उडाली; तातडीने समोर येत…मोठं संकट आलं?

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. याबाबत बोलताना गृहमंत्र्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही अप्रत्यक्ष टीका केली. दरवर्षी नव्या कर्जावर अवलंबून राहण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच गेल्या अनेक दशकांपासून देशाची प्रशासकीय व्यवस्था कमकुवत होत गेल्याचेही त्यांनी सांगितले.

CJP Pakistan Protest : भारतानंतर या देशात 'कॉकरोच'चं महावादळ, सरकारची झोप उडाली; तातडीने समोर येत...मोठं संकट आलं?
cockroach janta party in pakistanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2026 | 8:42 PM
Share

CJP Protest In Pakistan : भारतातील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनालमुळे संपूर्ण देश हादरला. सीजेपीने केलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. सीजेपीच्या या आंदोलनामुळे देशातील जेन झी तरुणाई एकवटली. या निमित्ताने संपूर्ण जगानेच जेन झीमध्ये असलेली ताकद पाहिली. भारताप्रमाणेच आमच्या देशातही असेच आंदोलन उभे राहिल्यास मोठं संकट उभं राहू शकतं, असं अनेक देशांना वाटत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता आपल्या शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानने सावध पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. या देशाचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी पुढे येत तरुणांच्या ताकदीवर भाष्य केलं आहे. सोबतच आपण तरुणांना रोजगार, नोकरी, शिक्षण देऊ शकत नसू तर हेच कॉकरोच एकत्र येऊन सगळं उद्ध्वस्त करू शकतात, असाही इशारा त्यांनी दिला आहे. एका प्रकारे सरकारने यावर काम केलं पाहिजे, असाच संदेश त्यांनी आपल्या विधानाद्वारे दिला आहे.

युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अपयशी

पाकिस्तान हा देश नेहमीच आर्थिक संकटात असतो. असे असताना देशाचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी तरुणांमधील वाढत्या असंतोषावर भाष्य केलं. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी “कॉकरोच” या शब्दाचा उल्लेख करत तरुणांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केल्यास ते देशासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा दिला. देशातील युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. “त्यांना तुम्ही तरुण म्हणा किंवा कॉकरोच म्हणा, पण हे सर्वजण एकत्र आले तर संपूर्ण व्यवस्था हादरू शकते,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानाची पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

देशाची व्यवस्था होतेय कमकुवत

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. याबाबत बोलताना गृहमंत्र्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही अप्रत्यक्ष टीका केली. दरवर्षी नव्या कर्जावर अवलंबून राहण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच गेल्या अनेक दशकांपासून देशाची प्रशासकीय व्यवस्था कमकुवत होत गेल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भारतात सुरू झालेल्या या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची पाकिस्तानातही तेवढीच चर्चा आहे. पाकिस्तानातील तरुणाईनेही भारतातल्या या आंदोलनाचे स्वागत केले होते. तसेच आमच्याकडे अशा प्रकारचे आंदोलन कधी होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. त्यामुळे आता भविष्यात तेथेही असेच आंदोलन उभे राहणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन