Tata Sons Chairman N Chandrasekaran : बाजी पलटली, टाटा कुटुंबातून विरोध असूनही एन चंद्रशेखरन पुन्हा बनले टाटा सन्सचे चेअरमन
Tata Sons Chairman N Chandrasekaran : आज बिझनेस क्षेत्रात एक महत्वपूर्ण घडामोड घडली आहे. टाटा सन्सच्या चेअरमनपदावर पुन्हा एकदा एन चंद्रशेखरन यांची निवड झाली आहे. महत्वाचं म्हणजे एन चंद्रशेखरन यांच्या फेरनिवडीला टाटा कुटुंबातूनच विरोध होता.

बिझनेस क्षेत्रातून एक मोठी बातमी आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांना अभय मिळालं आहे. टाटा सन्स लिमिटेडच्या बोर्डाने गुरुवारी एन चंद्रशेखरन यांना एग्जीक्यूटिव चेअरमन पदावर पाच वर्षांचा नवीन कार्यकाळ देण्यास मंजुरी दिली आहे. ग्रुपच्या होल्डिंग कंपनीला लिस्ट करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याचा अर्थ असा आहे की, चंद्रशेखरन IPO च्या तयारीत महत्वाची भूमिका बजावतील. एन चंद्रशेखरनच्या यांच्या एक्सटेंशनशिवाय टाटा सन्सच्या बोर्डाने कंपनीच्या लिस्टिंगला मंजुरी दिली आहे. चेअरमन पदावर चंद्रशेखरन यांची पुन्हा नियुक्ती करण्याच्या निर्णयाला टाटा ट्रस्टकडून आव्हान दिलं जाऊ शकतं. टाटा ट्रस्टचा होल्डिंग कंपनीत सर्वाधिक हिस्सा आहे. चंद्रशेखरन यांचा 20 फेब्रुवारी 2027 ला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. त्यानंतर तिसरा कार्यकाळ घेणार नाही अशी चंद्रशेखरन यांनी 12 ऑगस्टला घोषणा केलेली.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा ट्रस्टचे चेअरमन आणि टाटा सन्सचे डायरेक्टर नोएल टाटा यांनी फेब्रुवारी महिन्यात बोर्ड मीटिंगमध्ये चंद्रशेखरन यांच्या प्रस्तावित तिसऱ्या कार्यकाळाला विरोध केला होता. नोएल टाटा अजूनही नेतृत्व बदलाच्या बाजूने आहेत असं सूत्रांनी सांगितलं. टाटा ट्रस्टकडे एकूण मिळून टाटा सन्सची 66 टक्के हिसेदारी आहे.
सर्वाधिक हिस्सेदारी टाटा ट्रस्टसकडे
चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टरसह टॉप मॅनेजमेंटची निवड बहुमत असलेल्या शेअर होल्डर्सच्या पसंतीने होणार होती असं या घटनाक्रमाशी संबंधित असलेल्या लोकांनी सांगितलं. सर्वाधिक हिस्सेदारी टाटा ट्रस्टसकडे आहे. त्याचं प्रतिनिधीत्व टाटा ट्रस्ट्सचे चेअरमन नोएल टाटा करतात.पुन्हा चेअरमनपदासाठी अर्ज न करण्याच्या चंद्रशेखरन यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो असं सर दोराबजी टाटा ट्रस्टने (SDTT) सार्वजनिकरित्या म्हटलं होतं.
