AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंच्या पोस्टमुळे नवीन वाद, दिशा सालियनच्या वडिलांनी घेतला मोठा निर्णय, ते थेट मातोश्रीवर..

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंना अब्रुनुकसानीची नोटीस देणार असल्याचं दिशा सालियनच्या वडिलांनी सांगितलं आहे. त्यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांना ही नोटीस देणार असं म्हटलं आहे. याबद्दलची माहिती वकिलांनी दिली आहे.

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंच्या पोस्टमुळे नवीन वाद, दिशा सालियनच्या वडिलांनी घेतला मोठा निर्णय, ते थेट मातोश्रीवर..
disha salian aditya thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 17, 2026 | 5:16 PM
Share

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी, मुंबई : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची नोटीस देणार असल्याची सतीश सालियन यांच्या वकिलांनी माहिती दिली आहे. आदित्य ठाकरेंनी 16 तारखेला केलेल्या सोशल मीडीया पोस्ट विरोधात नोटीस देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी योग्य ती सुरक्षा देण्याची विनंती त्यांनी केली आहे. सतीश सालियन वकिलांसोबत स्वतः जाऊन 500 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस देणार अशी त्यांच्या वकिलांनी माहिती दिली.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. परंतू आज आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून स्पष्ट केलं की मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही. त्यांनी माझी दिशाशी ओळखही नव्हती असंही त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपलं चारित्र्यहनन करण्यासाठी राजकीय हेतून हे आरोप केले जात असल्याचे आदित्य ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. या पोस्टविरोधात त्यांना 500 कोटींची नोटीस देण्याची भूमिका दिशाच्या वडिलांनी वकिलांच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

आदित्य ठाकरेंची पोस्ट जशास तशी

मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे. कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!

Follow Us
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...